file photo 
विदर्भ

सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जमिनीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून फावड्याने डोक्‍यावर वार करून सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

शिवप्रसाद सुनाराम टोपो (वय 38) रा. मल्लमपाडी, ता. एटापल्ली, असे शिक्षा देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा भाऊ मृत नंदुराम सुनाराम टोपो यांच्यासोबत आरोपी शिवप्रसाद टोपो याच्या जबरान जमिनीचा हिस्सा मागणीवरून भांडण झाले होते. यावेळी मृत नंदुराम यांनी वडिलांची संपूर्ण जमीन तुला दिली आहे. त्यामुळे मी स्वतः तोडलेल्या जमिनीचा हिस्सा देणार नाही, असे बजावले होते. 

याचा राग धरून 2 मार्च 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नंदुराम लघुशंकेकरिता बाहेर गेला असताना आरोपी शिवप्रसाद हातात फावडा घेऊन आधीच लपून बसला होता. नंदुराम दिसताच त्याने फावड्याने त्याच्या डोक्‍यावर वार केला. तो खाली कोसळल्यानंतरही त्याने मारहाण सुरूच ठेवली. आरडाओरड झाल्यानंतर मृताची मुले, पत्नी व इतर नागरिक गोळा झाले. त्यामुळे आरोपी तिथून पसार झाला. याबाबतची तक्रार खुलासो नंदुराम टोपो हिने एटापल्ली पोलिस ठाण्यात दिली. यावरून आरोपीविरुद्ध कलम 302 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. 

पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून शनिवारी (ता. 4) आरोपीस कलम 302 मध्ये जन्मठेप व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा न्यायनिवाडा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT