Accused who misbehaved with girl sentenced to 10 years of jail  
विदर्भ

अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी आरोपीला न्यायालयाचा दणका; सुनावली तब्बल १० शिक्षा 

सूरज पाटील

यवतमाळ : शिकवणीवर्गातून ऑटो पॉइंटवर आलेल्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मंगळवारी (ता. आठ) हा निकाल अतिरिक्त सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला.

गुणवंता गेडाम (रा. डोंगरखर्डा, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोन जून 2017 रोजी अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्ग आटोपून ऑटो पॉइंटवर आली. त्यावेळी आरोपीने मुलीचा हात पकडून बसस्थानकाकडे बोलावले. जबरदस्तीने दुचाकीवर बसायला सांगितले. 

आरोपीचा मामेभाऊ नीलेश मुलीच्या सांगण्याप्रमाणे सोबत गेला. रावेरी गावाजवळ पोहोचताच नीलेशला दुचाकी थांबवायला सांगून गुणवंता मुलीला घेऊन पुलाखाली गेला. पीडितेसाबत अश्‍लील चाळे करायला सुरुवात करताच नीलेशने विरोध केला. मात्र, गुणवंताने जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. मोबाईलमध्ये अश्‍लील फोटो काढून ही बाब कुणाला सांगितल्यास फोटो लोकांना दाखविण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडितेने राळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक ए. एन. सोळंके यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित, आरोपीचा मामेभाऊ नीलेश, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. 

कलम 4 बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012प्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम 376 भादंविअंतर्गत शिक्षा कलम बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2011मध्ये समाविष्ट करण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.

मामेभावावर केली दगडफेक

गुणवंता मुलीसोबत वाईट कृत्य करीत असल्याचे बघून मामेभाऊ नीलेश याने विरोध केला. मात्र, गुणवंता काही ऐकण्याचा मानसिकतेत नव्हता. मामेभावाला पळवून लावण्यासाठी त्याने पुलाखाऊन दगडफेक केली. त्यामुळे नीलेश गेल्यावर गुणवंताने मुलीवर अत्याचार करून फोटो काढले. या खटल्यात नीलेशची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT