action against 7 tobacco sellers in gadchiroli district  
विदर्भ

तंबाखूची होळी! तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई

मिलिंद उमरे

कुरखेडा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील पुराडा येथे पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या मोहीम राबवत गावातील सात दुकानांची तपासणी केली. दरम्यान सातही दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण मुद्देमालाची होळी करून पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले.

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ व पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले. खर्रा, तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. 

पानठेले सुरू करून व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे सक्त आदेश असतानासुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहेत. गावात छुप्या मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिस व मुक्तिपथच्या तालुका चमूला मिळताच संयुक्तरीत्या दुकानांची तपासणी केली.

दरम्यान सात दुकानांमध्ये सुगंधित तंबाखू, गुडाखू, खर्रा, नस आदी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्या दुकानदारांकडून एकूण ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची होळी करीत गावात पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. ही कारवाई पुराडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस. गोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गणेश भर्रे, रवी उसेंडी, अवकाश मितनवरे यांनी केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ज्ञानेश कुमार यांचा 'या' राज्यातील दौरा स्थगित

Petrol-Diesel CNG Price: पुण्यात CNGच्या दरात वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलही महागले? मुंबईसह राज्यभरात नवे दर किती?

Explained : SIR विरोधात 'इंडिया' आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास विरोधकांची पुढची रणनीती काय? वाचा...

Latest Marathi News Live Update : 'इंडिया' आघाडीच्या निदर्शनानंतर जंतरमंतर परिसरात कडक सुरक्षा

Tukaram Mundhe FDA action : बाटलीतील पाणी दुषीत?, तुकाराम मुंढे याची मोठी कारवाई; ८० हजार बॉटल्सचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT