corona .jpg 
विदर्भ

कोरोनाची अफवा पसरविणे आले अंगलट; मग डॉक्टरही सुटला नाही

सकाळ वृत्तसेवा

जानेफळ/रायपूर (जि.बुलडाणा) : गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याचे व त्याला बुलडाणा येथे रवाना करण्यात आल्याची खोटी अफवा गुरुवार (ता.9) जानेफळ येथे पसरविल्याने गावात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर माहिती ही अफवा असून चुकीची असल्याचे पत्रकारांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर स्पष्ट केल्यानंतर मात्र गावकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे. याबाबत जानेफळ येथे एकाला कोरोना झाल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथे एका डॉक्टर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेफळ येथून कोणीतरी मोबाईलवरून तालुका प्रशासनास माहिती दिली की, बुलडाणा येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जानेफळ येथून एक व्यक्ती गेला होता. त्यामुळे त्याच्यात कोरोनाचे लक्षणे दिसत असून तो भीतीमुळे घरात दडून बसलेला आहे. सदर माहिती समजल्यानंतर महसूलचे मंडळ अधिकारी बी. जे. अनमोड यांना वरिष्ठांनी माहिती दिल्याने त्यांनी स्थानिक तलाठी, ग्रामसेवक व सरपंचांना माहिती कळविल्याने त्यांनीसुद्धा सदर माहिती मिळालेल्या व्यक्तीच्या घरी पोहोचून दवाखान्यात तपासणी करून घेण्याची विनंती केली. 

यामुळे सदर व्यक्तीने स्वतः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचून तपासणी करण्याची विनंती केली तेव्हा प्रकृती ठणठणीत असलेल्या त्याला आजारी असल्याचे किंवा कोरोना सारखे कुठलेच लक्षणे दिसत नसल्याने त्यांना घरी परत पाठविण्यात आले. परंतु, त्याला कोरोना झाल्याचे व त्यांना बुलडाणा येथे पाठविण्यात आल्याची विनाकारण खोटी अफवा पसरविण्यात आल्याने त्यांचे सर्वच कुटुंब घाबरून गेले होते. सदर अफवेची सत्यता जाणून घेण्यासाठी व त्या विषयी चौकशी तसेच विचारणा करणाऱ्यांचे अनेक फोन त्या कुटुंबाला येत असल्यामुळे ते सर्व कुटुंब त्रासून गेले होते.

याबाबत मानसिक तणावात टाकून बदनामी करणाऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तत्काळ कायदेशीर कार्यवाही करावी. जेणेकरून पुन्हा अशा घटनेला आळा बसेल अशी तक्रार शेख जलील शेख अहमद रा. जानेफळ यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला दिली आहे. तर, कोरोना व्हायरसबाबात व्हॉट्सअ‍ॅप्सवर अफवा परविल्याप्रकरणी एका डॉक्टरवर रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातत्याने प्रशासनाच्यावतीने सोशल मीडियावर कोरोना बाबत कोणीही अफवा तसेच जातीय तेढ निर्माण होणार अशा पोस्ट व्हायरल करू नये अशा सूचना देण्यात येत असतात. परंतु, बुलडाणा तालुक्यतीाल रायपूर येथील डॉक्टर पी. आर. खंडागळे यांनी चार ते पाच दिवसापूर्वी परिसरात व्हाट्सअ‍ॅप्स ग्रुपवर कोरोनाला एक विशेष समाज जबाबदार असून, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करुन नये अशी पोस्ट व्हायरल केली होती. 

यावर काही नागरिकांनी रायपूर पोलिसात धाव घेत सदर विवाद निर्माण करणाऱ्या पोस्टबाबत माहिती दिली. विशिष्ट धर्मातील नागरिकांविरोधात समाजामध्ये तेढ निर्माण करुन वाद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या पोस्टला पोलिसांनी गांभीर्याने घेत पोलिस कर्मचारी विजय पैठणे यांच्या तक्रारीवरून एका विशिष्ट समाजाप्रती कोरोनाला घेऊन अफवा पसरविल्याप्रकरणी आरोपी डॉ. पी. आर. खंडागळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार सुभाष दुधाळ करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : निफाड तालुक्यातील दुर्दैवी घटनेनंतर आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT