corona (2).jpg 
विदर्भ

सीईओंच्या पाहणी दरम्यान आढळला हा धक्कादायक प्रकार; म्हणून त्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यावर झाली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा व पारद येथे कार्यरत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी अनुपस्थित असल्याचे मंगळवारी (ता. 19) आढळून आले. त्यामुळे दोन डॉक्टरांची वेतन वाढ रोखण्यात आली असून एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती विनावेतन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या आकस्मिक पाहणी दरम्यान आढळलेल्या आरोग्य विभागाच्या या 18 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जिल्ह्यात सुद्धा धुमाकूळ घातला आहे. विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. संकटाच्या या स्थितीत आरोग्य यंत्रणेला 24 तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा व पारद येथे मंगळवारी (ता. 19) वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सदर दोन्ही केंद्रांना आकस्मिक भेट दिली असता आपातापा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन इंगळे व पारद येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. रुस्तम दामले अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोघांची एक वेतनवाढ रोखण्यात आली असून आपातापा येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन वराडे अनुपस्थित आढळल्यामुळे त्यांची अनुपस्थिती एक दिवस विनावेतन करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पारद येथे आठ कर्मचारी गैरहजर आढळल्यामुळे त्यांच्या वर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. 

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा येथील दहा कर्मचारी गैरहजर असल्यामुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित केली आहे. यापुढे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या भेटीदरम्यान कोणीही अधिकारी कर्मचारी गैरहजर आढळून आल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याची सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. त्यासोबतच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी हजर राहून सेवा द्यावी, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT