Action on unauthorized construction of direct architect of Akola Municipal Commissioner 
विदर्भ

मनपा आयुक्तांची थेट आर्किटेक्‍टच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिकेनेच्या हद्दतील नागरिकांना बांधकामाबाबत सल्ला देणारेच अनधिकृत बांधकाम करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शुक्रवारी मनपाने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. नकाशे तयार करणाऱ्यांचेच नकाशे आयुक्तांनी बिघडवण्यास सुरुवात केल्याची चर्चाया निमित्ताने बांधकाम क्षेत्रात सुरू आहे.     
मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी उमरी परिसरातील आर्किटेक्‍ट प्रमोद पाथरीकर यांच्‍या घराच्‍या बांधकामाची पाहणी गुरुवारी (ता.१२) केली होती. त्यावेळी त्यांचे बांधकाम हे नियमबाह्य असल्याचे आढळून आले. त्‍यामुळे निष्‍कासनाची कारवाई सुरू करण्यात आली. उरलेले अनधिकृत बांधकाम पाडण्‍यासाठी पाथरीकर यांनी वेळ मागितल्याने त्यांना वेळ वाढवून दिला. 

हॉटेल व्यावसायिक रडारवर
आयुक्त संजय कापडणीस यांनी व्यावसायिक इमारतींसह शिकवणी वर्गांच्या इमारतीवर कारवाई सुरू केली. त्यानंतर आता त्यांना बांधकाम क्षेत्रातील नकाशे तयार करणाऱ्यांवरच हात घातला. सोबतच त्यांनी हॉटेल व्यावसायिकांवरही कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी रेल्वे स्थानकावरील हॉटेलवर कारवाई केली होती. शहरातील इतर हॉटेल व्यावसायिकांच्या इमारतीकडेही लवकचर मनपाचा मोर्चा वळणार असल्याची माहिती आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT