Sailani Dargah.jpg 
विदर्भ

सैलानी यात्रेत ते अघोरी उपचार करणाऱ्यावर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानीबाबा यात्रेत अघोरी उपचार करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कठोर पवित्रा घेतला असून, असे उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

देशभरात प्रसिद्ध असलेली सैलानी बाबांची यात्रा येत्या 9 मार्च पासून सुरू होत आहे. यात्रेमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या व त्यांच्यावर होणारे अघोरी उपचार यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. लाखो भाविक या ठिकाणी येतात. याचा फायदा घेऊन अनेक भोंदू बाबा या ठिकाणी येऊन रुग्णांवर अघोरी उपचार करतात. 

असे होतात अघोरी उपचार
रुग्णांना मारहाण करणे महिलांच्या डोक्यावरील केस उपटणे, बिबे-गोटा, खिळे झाडाला ठोकणे मनोरुग्णांच्या अंगावर लिंबू पिळणे, असे अघोरी उपचार करतात. अशा प्रकाराविरोधात प्रशासन गंभीरपणे दखल घेत आहे. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील हे प्रकार थांबविण्याची मागणी केलेली आहे. एकंदरीत सैलानी यात्रेबाबत प्रशासन गांभीर्याने घेत असून या ठिकाणी होणारे जादूटोणा व उपचार थांबविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT