बालविवाह  
विदर्भ

शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

सूरज पाटील

यवतमाळ : जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, शासनातर्फे विवाहासाठी मर्यादित लोकांची अट घालण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात लगीनघाई दिसून येत आहे. नेर तालुक्‍यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथे बालसंरक्षण कक्षाने विवाह थांबविला. त्यानंतर घाटंजी तालुक्‍यात नियोजित विवाहाचा डाव उधळून आला.

बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र, याला न जुमानता त्याच मुलीचा विवाह 20 एप्रिलला वरमंडपी घाटंजी तालुक्‍यात पंगडी येथे नियोजित होता. याबाबत गोपनीय माहिती घाटंजी येथील तहसीलदार तथा तालुका बालसंरक्षण समितीच्या अध्यक्षा पूजा मातोडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क केला. लग्नमंडपी प्रशासन पोहोचले असताना मोठा सभामंडप, डीजे, रोषणाई व नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यामध्ये शेवटचे मंगलाष्टक सुरू होते. मात्र, यावेळी प्रशासन धडकल्याने सर्वांची तारांबळ उडाली.

या सोहळ्यात कोरोना काळातही मोठी गर्दी केल्याचे व बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तहसीलदार पूजा मातोडे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वधू व वधूचे आईवडील सध्यास्थितीत फरार आहेत.

घाटंजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भुजाडे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, तालुका बालसंरक्षण समितीचे सदस्य अरुण कांबळे, ग्रामसेवक राजाराम बोईनवार, अंगणवाडीसेविका छाया चौधरी व अर्चना आत्राम, तलाठी मुन, मोहन बागेश्वर, सरपंच यमुना मेश्राम, उपसरपंच प्रमोद कदम, कोतवाल अमोल घोडाम यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंगावर शाल, कानावर रुमाल; बहुमत पाहिजे म्हणून आजारी नगरसेवकाला रुग्णालयातून थेट बैठकीला आणलं

Vishnupuri Dam: ‘विष्णुपुरी’ ९७ टक्के भरले; गेट उघडणार; नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली; एका दिवसातच ५५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

Friendship Day 2026: मैत्रीचा उत्सव! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि मित्रांसाठी खास शुभेच्छा मेसेज...

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये मुसळधार पाऊस; पुरात ६ जण वाहून गेले

Purwa Falls Viral Video: या धबधब्या पुढे सारं काही फिके! पाहा २३० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पाण्याचे अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT