file photo
file photo 
विदर्भ

आपत्ती, आरोग्य, पोलिस विभागाला हाय अलर्ट

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा तालुक्‍यातील 24 गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. काही मिनिटे जाणवलेल्या हादऱ्यांची माहिती जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने रात्रीपासून आपत्ती, आरोग्य तसेच पोलिस विभाग हाय अलर्टवर ठेवले आहेत. अमरावती जिल्ह्यातील पार्डी तसेच लातूर येथील केंद्राच्या संपर्कात प्रशासन आहे.
जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, महागाव, घाटंजी, आर्णी तसेच दारव्हा या सहा तालुक्‍यांतील 24 गावांना शुक्रवार (ता. 21) रात्री सव्वानऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील पार्डी येथे 160 किमी अंतरावर जाणवले. समाजमाध्यमावरून भूकंपाची माहिती काही मिनिटात जिल्हाभऱ्यात झाल्याने भीतीचे वातावरण रात्रभर होते. प्रशासनाला नागरिकांनी माहिती दिल्यानंतर प्रशासनाने तयारी केली. रात्री जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, पोलिस प्रशासन, आपत्ती विभाग "हाय अलर्ट'वर होते. सर्व कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. तसेच ज्या 24 गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्या भागात तहसीलदारांपासून तर तलाठ्यांनी रात्री गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या गावांना जाणवले धक्के
उमरखेड-कुरळी, नारळी, बोरगाव, साखरा, निंगनूर, अकाली, मल्याळी, ढाणकी, बिटरगाव, खरुस, चातारी, एकांबा, टेंभूरदरा.
दिग्रस - सिंगद
महागाव - हिवरा संगम, इंजनी.
घाटंजी - चिलखवर्धा, कुरली.
आर्णी-राणी धानोरा, अंजनखेड, साकूर, मुकिंदपूर.
दारव्हा - खोपडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT