Gadchiroli solar lamp 
विदर्भ

72 वर्षांनंतरही होता काळोख, आता सौरदिव्यांनी उजळले हे गाव 

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : देशाला स्वतंत्र होऊन तब्बल 72 वर्षे झाली, तरी गडचिरोली जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, तिथे अद्याप वीज पोहोचली नाही. अशाच गावांपैकी एक असलेल्या मोदूमोडगू गावातील अंधार काही प्रमाणात दूर झाला आहे. याला कारण हेल्पिंग हॅण्ड्‌स फाउंडेशन व मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने गावात लावलेले सौरदिवे आहेत. 

रात्री गावात राहतो काळाकुट्ट अंधार 

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर वीज पोहोचली नाही. या गावांतील नागरिकांना केरोसीनच्या दिव्यात, कंदिलात रात्र काढावी लागते. उज्ज्वला गॅस योजना व इतर अनेक योजनांतून घरगुती गॅस वितरित करणे सुरू झाल्यानंतर सरकारने केरोसीन पुरवठाही थांबवला आहे. त्यामुळे अनेक गावांतील नागरिकांना रात्र काळ्याकुट्ट अंधारात काढावी लागते. ही गावे डोंगराळ भागात, घनदाट अरण्यात असल्यामुळे रात्री साप, विंचू इत्यादी सरपटणारे विषारी प्राणी व हिंस्र वन्यप्राण्यांच्या भीतीने रात्री घराबाहेर पडता येत नाही. शिवाय रात्रीच्या अंधारात विद्यार्थ्यांना नीट अभ्यासही करता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. गडचिरोली जिल्ह्याचा बराच भाग अतिदुर्गम व उंच डोंगराळ भागात आहेत. तिथे वीज खांब लावून वीज पोहोचविणे अतिशय कठीण काम आहे. 

सौरदिवे वितरित

अशा अतिदुर्गम भागात वीज पोहोचायला आणखी बराच काळ जावा लागेल. तोपर्यंत येथील आदिवासी विजेपासून अंधारमय वातावरणात जगू नयेत म्हणून हेल्पिंग हॅण्ड्‌स फाउंडेशनसह मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने सौरदिव्यांचे वाटप सुरू केले आहे. याच उपक्रमाअंतर्गत मोदूमोडगू गावात हे दिवे वितरित करण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तब्बल सात दशकांच्या काळानंतर या गावात रात्री घराघरात प्रकाश दिसणार आहे. 

रस्त्याचीही समस्या..

कमलापूरजवळील मोदूमोडगू हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात असून कमलापूरपासून 12 किलोमीटर दूर आहे. या गावात अद्याप शासकीय योजनासुद्धा पोहोचल्या नाहीत. या गावाला जायला रस्ता नाही. येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांना अभ्यास करण्याकरिता विजेची व्यवस्था नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत हेल्पिंग हॅण्ड्‌स फाउंडेशन अहेरी, कमलापूर यांच्या पुढाकाराने व दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मदतीने दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना 40 सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे या आदिवासींचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT