After the girl's death, the women became agitated 
विदर्भ

भावनांचा उद्रेक; नेते, प्रतिनिधींवर महिला भडकल्या तसेच रुग्णवाहिकेवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिताचा मृतदेह तिच्या दारोडा गावी येताच नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. यावेळी संतप्त जमावाने पोलिासांसह अंकिताचा मृतदेह नसलेल्या रुग्णवाहिकेवरही दगडफेक केली. यामुळे जमावाला पंगविण्याकरिता पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला. अंकिताचा मृतदेह घरी पोहोचताच आमदार, खासदार यांच्यासह अनेक जण तिच्या घरी पोहोचले. त्यांची गर्दी होत असल्याने गावातील महिला त्यांच्यावर चांगल्याच भडकल्या. त्यांना घराबाहेर काढण्याची मागणी संतप्त महिलांनी केली. 

अंकिताचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गावाकडे निघाल्याची माहिती नागरिकांना होताच तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. यावेळी संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. यामुळे रासत्याच्या दुतरफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचण्यासाठी विलंब झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. मृतदेह अंकिताच्या घरपर्यंत नेण्यासाठी चालकाला त्रास सहन करावा लागला. 

कलोडे चौकात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच महामार्गावरून पीडित प्राध्यापक तरुणीचा मृतदेह रुग्णवाहिकेने गावी पोहोचवला जाणार होता. मात्र, संतप्त नागरिकांनी रस्त्यातच रुग्णवाहिका अडवली. यावेळी नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. दगडफेक केल्याने रुग्णवाहिकेच्या काचाही फुटल्या होत्या. यामुळे परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

अंकिताच्या घरसमोर नागरिकांची गर्दी

उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांना होताच गावात स्मशान शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या तोंडून आरोपीलाही पेटवा अशीच भावना व्यक्त होत होती. मृतदेह गावात येताच या भावना अनावर झाल्या. संतप्त नागरिकांनी आरोपी अंकितच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती.

आरोपीला जाळून टाका, जाळून टाका

संतप्त नागरिक न्यायासाठी रस्त्यावर उतरल्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, फाशी द्या, आरोपीला फासावर चढवा, जाळून टाका जाळून टाका अशा घोषणा देत संताप व्यक्‍त केला. नागरिकांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत नागरिकांची धक्‍काबुक्‍की झाली. यामुळेही काही काळ तणाव निर्माण झाला होता. हिंगणघाट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT