Visarjan 
विदर्भ

काय ही कल्पकता! गणेशाच्या घरीच विसर्जनानंतर त्याच मातीत लावणार फुलझाड 

कृष्णा लोखंडे

अमरावती ः श्रीगणेशाला निरोप देण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भक्त यंदा घरगुती विसर्जनावरच भर देत असल्याचे दिसत आहे. मातीच्या मूर्तींची स्थापना तुलनेने अधिक करण्यात आल्याने व विक्रेत्यांनी पर्यावरणाचे ध्यान ठेवत विसर्जनासाठी मूर्तीसोबत कुंडी दिल्याने भक्तांना घरीच विसर्जन करण्याची सोय झाली आहे. 

अमरावती महापालिकेने मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन दिल्याने मूर्तिकारांनी यंदा तब्बल ५३ हजार मातीच्या मूर्ती निर्माण करून विक्रीकरिता बाजारात आणल्या. गणेशभक्तांनीही प्रतिसाद देत या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. काही विक्रेत्यांनी मूर्तीसोबत फुलझाडे लावण्याची कुंडी भेट दिली. यामागे घरातच टबमध्ये मूर्तीचे विसर्जन करून ती माती कुंडीत भरून त्यामध्ये फुलझाड लावावे, अशी कल्पक योजना आहे. 

गणेशभक्तांनी कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तिकारांच्या योजनेला प्रतिसाद देत गणेश विसर्जनासाठी घराबाहेर न जाता घरीच टबमध्ये विसर्जन करण्यावर भर दिला आहे. रविवारपासून शहरात अनेक ठिकाणी घरगुती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. भक्तांनी घरीच टब, मोठे घमेले, बादली यांचा विसर्जन कुंड म्हणून उपयोग करून विसर्जन केले. त्यातील माती कुंडीत भरून फुलझाड लावण्याची योजना अमलात येणार आहे. यामुळे गणेशाचे वास्तव्य घरातच राहणार असून फुलझाडांच्या रूपाने श्रीगणेश स्मरणात राहणार आहे, अशी भावना आहे. 

पर्यावरणासोबत भावना जपण्याचा प्रयत्न 

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना फाटा देत मातीच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला. पर्यावरणाचे लक्ष ठेवत या मूर्ती बनविल्या तरी ग्राहकांचा प्रतिसाद गेल्या दोन वर्षांत फारसा मिळाला नाही. गतवर्षीपासून मूर्तीसोबत कुंडी भेट देणे सुरू केल्यानंतर मात्र ग्राहकांचा कल वाढला. यंदा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे पर्यावरणासोबतच भावना जपता आल्या, असे नीलेश कंचनपुरे यांनी सांगितले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

Latest Marathi News Live Update : कन्नडमध्ये धारदार शस्त्राने एकाचा खून

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT