After Shivkumar, M. S. Reddys suspension Amravati deepali chauhan suicide news 
विदर्भ

Breaking : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; शिवकुमारनंतर एम. एस. रेड्डी यांचे निलंबन

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे अखेर मंगळवारी निलंबन झाले. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट होती. त्यानंतर निलंबनाची कारवाई झाल्याचे समजते.

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी धारणी न्यायालयाने विनोद शिवकुमार याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. रविवारी त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली होती. रविवारी दुपारी धारणी पोलिसांचे पथक विनोद शिवकुमारच्या चिखलदरा येथील बंगल्याच्या तपासणीसाठी गेले होते. त्यांनी बंगल्याची कसून तपासणी केली. पथकात मोर्शीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गीते, पोलिस कॉन्स्टेबल सचिन होले यांच्यासह धारणी पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात काही लोक वरिष्ठांचे कान भरत असल्याने आपला त्रास वाढल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे लोकं कोण आहेत, याचा शोध धारणी पोलिस घेत होते. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या लिहिलेल्या पत्रात त्यांच्या मृत्यूला शिवकुमार सर्वस्वी जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवकुमारला अटक करण्यात आली.

शिवकुमारवर यापूर्वी निलंबनाची कारवाई

आर.एफ.ओ. दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी हरिसाल येथे शासकीय निवासस्थानी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्हरमधुन गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली चार पानाची चिठ्ठी धारणी पोलिसांनी जप्त केली होती. चिठ्ठीमध्ये उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्या त्रासाचा उल्लेख होता. याच पार्श्वभूमीवर नागपुरातून शिवकुमारला अटक करण्यात आली होती. शिवकुमारवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली चार पानाची चिठ्ठी

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्रप्रकल्प, अमरावती एम.एस.रेड्डी यांच्या नावे सदर चिठ्ठी दीपाली चव्हाण यांनी लिहिली आहे. कुणाच्याही ऐकण्यावरून वारंवार निलंबित करणे, चार्जशिट दाखल करण्याची धमकी शिवकुमार यांच्याकडून मिळत होती. पुनर्वसनाची जबाबदारी असल्यानंतर ग्रामस्थांसमोर अनेकदा आपली बाजू ऐकून न घेता शिवकुमार यांनी शिवीगाळ केली. रजा कालावधीमधील सुटी नाकारण्याची शिफारस सुद्धा त्यांनी केली होती. असे दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानाच्या चिठ्ठीत नमुद केले आहे.

रेड्डी म्हणाले होते ‘माझी बदली नियमानुसार नाही’

एम. एस. रेड्डी यांना दिपालीने वारंवार सूचित केल्यानंतरही त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शिवकुमार यांचे निलंबन तर रेड्डी यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधूनसुद्धा मी त्यांना मदत केल्याचेच दिसून येते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी न करता माझी तडकाफडकी बदली करणे हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नसल्याने याबाबत पुनर्विचार करून झालेली बदली रद्द करून न्याय द्यावा, अशी मागणी रेड्डी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) नागपूर यांच्या नावे पाठविलेल्या पत्रातून केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT