Dagadfek 
विदर्भ

एकमेकांवर गोटमार केल्यानंतर त्यांनी भिरकावले चक्क ठाण्यावर दगड... 

रमेश मालवीय

धारणी (जि. अमरावती)  : परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन गटांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतरही पोलिस ठाण्याच्या परिसरातच जमून दोन्ही गटांनी वाद घातला. त्यानंतर ठाण्यावरच दगडफेक केल्याने पीएसआयसह पाच कर्मचारी जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास धारणी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आहे. 

सलीम शेख अजगर (रा. उतावली, धारणी) व रयना बानो मो. असलम (वय 35) या दोघांनी परस्परविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. उधारीचे पैसे मागण्यावरून त्यांच्यात फोनवरून आधी संभाषण झाले. त्यानंतर वाद वाढला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे बघून दोन्ही गट तक्रार नोंदविण्याकरिता धारणी ठाण्यात दाखल झाले. परस्परविरुद्ध तक्रारीवरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलिसांनी घेतली.

हे गट समोरासमोर आल्यामुळे ठाण्याच्या परिसरात शिवीगाळ, वाद सुरू झाला. पोलिस निरीक्षक लहू मोहंदुळे व उपनिरीक्षक चाफले यांनी त्या लोकांची समजूत काढून ठाण्याच्या बाहेर जाण्याची विनंती केली. परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांच्यात वाद वाढला. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांवर राग काढत जमावातील काहींनी ठाण्यावर दगड भिरकावले. या दगडफेकीत पीएसआय चापले, पोलिस कर्मचारी राहुल पवार, बाळापुरे, योगेश राखुंडे व दोन महिला पोलिस किरकोळ जखमी झाले. 

सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे 

दोन्ही गटातील वादानंतर उद्भवलेली परिस्थिती ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. त्यात धुमाकूळ घालणारे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात जमावबंदी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक लहू मोहंदुळे यांनी सांगितले. 


दोन गटात आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यावर पोलिसांनी आवश्‍यक कारवाई केली. वादानंतर गुन्हे दाखल केले. आता त्यांच्या अटकेची कारवाई सुरू केली आहे. 
- डॉ. हरिबालाजी एन., पोलिस अधीक्षक, अमरावती. 

संपादन  : राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT