Agricultural centers will also be licensed online
Agricultural centers will also be licensed online 
विदर्भ

कृषी केंद्रांचा परवानाही आता मिळणार ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ  : बियाणे, खते व कीटकनाशक परवाने काढताना, त्यांचे नूतनीकरण करताना अनेक अडथळे संबंधितांना पार करावे लागत होते. हे सर्व अडथळे बाजूला सारत पडद्यामागील घडामोंडींना आळा बसविण्यासाठी आता थेट ऑनलाईनच परवाने देण्यात येणार आहेत. असा प्रयोग करणारा यवतमाळ हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. ही अभिनव संकल्पना राबविणारे जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्तांनी यासाठी कौतुक केले आहे.

हे परवाने मिळवताना काहीवेळा तर "चिरीमिरी'साठी कागद अडकल्याची चर्चा होत होती. या सर्व बाबींना आळा घालण्याची किमया जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केली. कार्यालयातील स्टेशनरी खर्च, कर्मचाऱ्यांचा वेळ, परवानाधारकांचा वेळ व खर्च बचत करीत परवाने घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल स्वाक्षरीचा परवाना देण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

परवानाधारकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर कुठेही न जाता कागदपत्रांची पूर्तता केल्यास घरपोच परवाना मिळणार आहे. यापूर्वी नवनाथ कोळपकर यांनी कृषी विभागाच्या सर्व योजना शेतक ऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एका मेसेजवर आणल्या आहेत. या उपक्रमांची प्रशंसा राज्यभरात झाली आहे. यानंतर आता डिजिटल स्वाक्षरीचे परवाने थेट मोबाईलवर उपलब्ध करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. या अभिनव उपक्रमाची दखल कृषी सचिव एकनाथ डवले तसेच प्रभारी कृषी आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेत इतर जिल्ह्यातही असा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

कृषी केंद्रही आता डिजीटल

जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांच्या या अभिनव प्रयोगाने कृषी केंद्रही आता डिजीटल झाले आहे. यामुळे परवाना प्राप्तीतील दिरंगाई, कार्यालयातील स्टेशनरी खर्च, कर्मचाऱ्यांचा वेळ आणि विशेषत: परवानाधारकांचा वेळ आणि मनस्ताप या सगळ्याचीच बचत होणार आहे.


असा मिळणार परवाना

कृषी सेवा केंद्र चालकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होणार आहे. यानंतर तालुकानिहाय वर्गीकरण होईल. कोणत्या गावासाठी तो अर्ज आहे याची माहिती मिळेल. जिल्हा कृषी अधीक्षकांनी डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतर त्याच ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीचा परवाना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी संबंधितांना कृषी अधीक्षक कार्यालयात येण्याची गरज नसेल. त्याची प्रिंट काढून तो परवाना कृषी केंद्रात लावता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

GT vs CSK Live IPL 2024 : चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर तर गुजरात इलिमिनेशन टाळण्यासाठी जोर लावणार

Karnataka Crime: 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न पुढे ढकलल्याने मुलीचं डोकं उडवलं; एक दिवसापूर्वीच झाली होती दहावी पास

SCROLL FOR NEXT