Ajit Pawar said, NCP will expand in Vidarbha 
विदर्भ

अजित पवार म्हणाले, विदर्भात राष्ट्रवादीचा करणार विस्तार 

वीरेंद्रकुमार जोगी

नागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रवादी पार्टी हा ठपका पुसून काढण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भात विस्तार करण्याचे ठरविले आहे. यासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूतोवाच केले. मंगळवारी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कॉंग्रेसची अचानक बैठक घेतली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

विदर्भातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार निवडून आले आहेत. याचा फायदा घेतला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. भाजपची सत्ता स्थापनेची धडपड सुरू असताना शरद पवार यांनी दोन दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन केले. जे कोणी काही कारणांमुळे पक्षापासून दुरावले त्यांनाही पुन्हा जोडण्यात येणार आहे. पवारांचे वारंवार होणारे दौरे बघता आता राष्ट्रवादीचे टार्गेट विदर्भ असल्याचे मानले जात आहे. 

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी राष्ट्रवादीची विदर्भात चांगली कामगिरी झाली आहे. अजित पवार स्वत: जातीने लक्ष घालणार आहेत. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

महाआघाडी सरकारच्या आगामी धोरणांविषयीची माहिती कार्यकर्त्यांना देताना युती सरकारच्या कार्यकाळात घेतलेले शेतकरीविरोधी निर्णय रद्द करणार असून शेती समृद्धी व रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेशचंद्र बंग, मधुकर कुकडे, निरीक्षक धनंजय दलाल, शब्बीर विद्रोही, विजय घोडमारे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

Horoscope Astrology : 'या' 3 राशींचे लोक खूप वर्षे जगतात, उतार वयात मिळतं सगळं सुख..पाहा यात तुमची रास आहे का?

Lasalgaon News : कर्मवीर बंधारा तुटला, पूल व रस्ता वाहून गेल्याने गोळेगाव-गोंदेगाव वाहतूक ठप्प; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

NZ vs WI : वेस्ट इंडिजने ६.२ षटकांत १०६ धावा चोपल्या, पण विजयासाठी ४ चेंडूंत ७ धावा नाही करता आल्या; भन्नाट मॅचने जिंकली मनं...

SCROLL FOR NEXT