Akola Agricultural Assistant demands bribe for farmer
Akola Agricultural Assistant demands bribe for farmer 
विदर्भ

कृषी सहाय्यिकेनी मागितली शेतकऱ्याला लाच

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे अनुदान काढताना अडवणूक केली जात असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात गोरेगाव येथे फळबाग योजनेअंतर्गत तक्रारदाराने लिंबूची लागवड केली होती. तक्रारदाराचे लिंबू रोपांचे साडे अकरा हजार रुपयांचे मस्टर वरिष्ठांना पाठविण्याच्या मोबदल्यात पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या कृषी सहायिकेसह एकाविरुद्ध आलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संशय आल्याने कृषी सहायिकेने पैसे स्विकारले नसल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

 याबाब अधिक माहिती अशी, गोरेगाव येथील कृषी सहायिका ललीता तायडे (ललीता इंगोले) व धम्मपाल तायडे याने तक्रारदारास पाचशे रुपयांची लाच मागितली होती. याबाबत 21 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने प्रकरणाची खातरजमा केली. संशय आल्याने आरोपींनी लाच स्विकारली नाही.

याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तक्रारदाराला प्रत्येक मस्टर सादर करताना पाचशे रुपयांची लाच मागण्यात आली होती. अखेरीस त्याने कंटाळून याप्रकरणी लाचलुचपत खात्याकडे तक्रार दिली. त्यानंतर कारवाई करण्यात आली.  ही कारवाई अमरावती विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक एस. एस. मेमाने तसेच संतोष दहिहंडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT