Akola headmaster gather for salary in panchayat samiti at murtizapur 
विदर्भ

पगारासाठी मुख्याध्यापकांनी केली झुंबड, लॉकडाऊनचा उडाला फज्जा,  अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : 'वेतन देयकावर स्वाक्षरी करायला पंचायत समितीत हजर रहा', अशा बीईओंच्या संदेशाचे पालन करणाऱ्या या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची आज सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयावर एकच झुंबड उडाली आणि लॉकडाऊनचा पार फज्जा उडाला.

मूर्तिजापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षकांची वेतन देयके पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तयार करवून घेतली जातात. या देयकांवर डीडीओ-१ म्हणून संबंधित शाळेचा मुख्याध्यापक व डीडीओ-२ म्हणून गट शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असते. देयक तयार होऊन मिळताच संबंधित लिपीक गट शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना संदेश/निरोप देऊन पंचायत समितीत स्वाक्षरीसाठी बोलावतात. असाच व्हॉटस् ॲप संदेश काल संध्याकाळी संबधित केंद्रप्रमुखांमार्फत मुख्याध्यापकांना गेला. ' माहे एप्रिल-२०२० ची शालार्थ प्रणाली देयके तयार आहेत. बुधवारी (ता.२९) सकाळी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित रहा, आपल्या संबंधित बीट लिपिका मार्फत देयके प्राप्त करून घ्या', या आशयाचे तंतोतंत पालन करत सकाळी तालुक्यातील ६० ते ७० मुख्याध्यापक पंचायत समितीत धडकले. 

काय होता आदेश?
कोरोना विरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवरील लॉक डाऊनचे पालन न करता, सोशल डिस्टंसिंग न राखता मुख्याध्यापकांची एकच झुंबड उडाली व पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले. विशेष म्हणजे याच संदेशापूर्वी एक संदेश सर्वांना व्हॉटस् ॲप वरून पाठविण्यात आला होता. त्यात टाय, बुट, बेल्ट योजनेच्या पावत्या व विद्यार्थ्यांची यादीसह केंद्रांची संकलित माहिती लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करून, सोशल डिस्टंसिंग राखून बीआरसीत सादर करा, असे बीईओंच्या या संदेशात नमुद होते. 

मी आज कार्यालयीन कामासाठी जिल्हा परिषदेत आहे. केंद्रप्रमुखांना दिलेल्या संदेशात लॉक डाऊन चे नियम पाळा, सोशल डिस्टंसिंग राखा, अशा स्पष्ट सूचना नमुद केल्या आहेत.
-स्मीता धावडे (परोपटे). गटशिक्षणाधिकारी,  पं.स.मूर्तिजापूर.

खुलासा द्या
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल आपणाविरूद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलाश्यासह आपले म्हणणे या कार्यालयास २४ तासांच्या आत व्यक्तीशः सादर करा, अन्यथा आपल्या विरूद्ध पुढील कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी गट विकास अधिकारी अगर्ते यांना बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT