akola students and laborers left Pune-Mumbai towards the village
akola students and laborers left Pune-Mumbai towards the village 
विदर्भ

coronavirus:पुणे-मुंबईतून विद्यार्थी, मजुरांची पावले गावाकडे!

सकाळ वृत्तसेवा

अकोला / वाशीम :  जिल्ह्यातून महानगरांत शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, कामाच्या शोधात गेलेले मजूर वर्ग ‘कोरोना’च्या धास्तीने गावाकडे परत येत आहेत. विदेशातून किंवा मोठ्या शहरातून येणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांसाठी जिल्हा, तालुकास्तरावर आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे. मात्र, काही जण तीव्र लक्षणे जाणवूनही आरोग्य तपासणीविनाच घर जवळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने आरोग्य तपासणी करूनच घरी जाण्याची गरज निर्माण झाली आहे.


जिल्ह्यातून बरेचजण शिक्षणासाठी विदेशात किंवा महानगरांत जातात. तसेच ग्रामीण भागात हाताला कामे उपलब्ध नसल्याने मजूरदारवर्ग कामाच्या शोधात सुद्धा महानगर गाठतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’च्या धास्तीमुळे प्रत्येकजण सुरक्षीतता बाळगत आहे. आरोग्य विभागाकडूनही वेळोवेळी खबरदारीबाबत सूचना दिल्या जात आहेत. ही बाब पाहता शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी, पालक आपल्या पाल्यांना गावाकडे बोलावून घेत आहेत. सोबतच, मजूरदार वर्गांच्या कामांवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, मजूरदारवर्ग गावाकडे येत आहेत. महानगरांतून गावांकडे येणार्‍यांनी विशेषतः ताप, सर्दी, खोकला, गळा खवखवणे आदी लक्षणे दिसून आल्यास, अशा नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. तसेच आवश्यकता वाटल्यास आरोग्य विभागाकडून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपचार देखील करता येऊ शकतात.
 
कर्मचाऱ्यांची सुरक्षीतता गरजेची
शहराच्या ठिकाणी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत आहेत. ‘कोरोना’ या आजाराच्या दृष्टीने सरकारी तसेच खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलिसांनीही बाळगावी सुरक्षा
वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी शहरातील वर्दळीच्या चौकांत कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे त्यांचे कर्तव्य गर्दीच्या ठिकाणीच जास्त असते. ही बाब पाहता, वाहतूक विभागातील पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीतता बाळगण्याची गरज आहे.

जास्त लोकसंख्येच्या गावातील शाळांनाही सुट्टीची गरज
शासनाने महानगरपालिका, नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या. मात्र, जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील गावे लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यामध्ये शिरपूर, अनसिंग, शेलुबाजार आदी गावांचा समावेश आहे. या ठिकाणी परिसरातील गावांतील मोठ्यासंख्येने विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे अशा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्टीची मागणी केली जात आहे.
 
वातावरणातील बदलानेही पडसे, खोकला
गेल्या काही दिवसांत सारखे ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. कधी प्रखर सूर्यप्रकाश, कधी ढगाळी वातावरण, तर कधी थंडगार हवा सुटत आहे. या बदलत्या वातावरणामुळे देखील पडसे, खोकला, ताप आदी तक्रारी जाणवत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून उपचार घेणे गरजेचे आहे. याबाबत उगीच काळजी करण्याची गरज नसल्याचे दिसून येते.

काळजी नको; सावधानता बाळगा!
-साबण, पाण्याने हात स्वच्छ धुणे
-शिंकताना, खोकलताना नाका-तोंडावर रुमाल धरणे
-सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्यांशी संपर्क टाळणे
-मांस, अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घेणे
-जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी संपर्क टाळणे
-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT