truck.jpg 
विदर्भ

धक्कादायक! रात्री 8 वाजता घरुन गेला....सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : तो होता ट्रकचालक. बारा चाकांचा ट्रक नित्यनेमाने मालवाहतूक करताना चालवायचा. काल संध्याकाळी घरी आला. जेवला. रात्री 8 वाजता बाहेर गेला अन् सकाळी त्याचा मृतदेहच शेतशिवारात आढळला.

ही घटना आहे या शहरातील देवरण रस्त्यावरील मोहंमदीया प्लॉट लगतच्या शेत शिवारातील. शेख वसिम शेख कलीम हा येथील खडकपुऱ्यात राहणारा 26 वर्षीय ट्रकचालक. नेहमीच ट्रक चालवायचा. भाड्याने माल वाहून न्यायचा. असाच आपल्या कामावरून तो परतला. बहुतेक वसुली करून परतला असावा. सध्याकाळी जेवण करून रात्री आठच्या दरम्यान बाहेर पडला. 

रात्रभर घरी परतलाच नाही. त्यामुळे सकाळी शोधाशोध झाली. देवरण रस्त्यालगत मोहंमदिया प्लॉटमधील एका शेतात त्याचा मृतदेह आढळला. गळा आवळून त्याचा खून झाल्याचे त्याच्या गळ्याभोवती आवळलेल्या दुपट्ट्यावरून प्रथमदर्शनी जाणवत होते. मात्र, त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याच्या खूणाही दिसत असल्याने हा निर्घूण खून असल्याचा कयास बांधला जात आहे.

घटनास्थळाला उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, शहर ठाणेदार दत्तात्रय अव्हाळे, उपनिरिक्षक शिंदे, हेकॉ दीपक इंगळे तसेच मुख्याधिकारी विजय लोहकरे घटनास्थळी पोहोचले. श्वानपथक पाचारण करण्यात आले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT