Alcohol in Haryana was to be sold in Yavatmal, Wardha 
विदर्भ

धक्कादायक... हरियाणातील दारूची यवतमाळमध्ये एंट्री, या शहरात होणार होती तस्करी

सूरज पाटील

यवतमाळ  : केवळ हरियाणात विक्रीस मान्यता असलेल्या दारूची यवतमाळात एंट्री झाली. येथून वर्धेत दारूतस्करी करण्याचा प्रयत्न असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून तस्करांचे मनसुबे उधळले. ही कारवाई शुक्रवारी (ता. 11) पहाटेच्यादरम्यान डोर्ली व डोळंबा येथील एका गोदामाजवळ करण्यात आली. यावेळी एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विनोदकुमार राजपूत (वय 32, रा. खाकाबाग, जि. इटावा, उत्तर प्रदेश), दिनेश येंडाळे (वय 29, रा. नालवाडी, वर्धा), निकेत पडडाखे (वय 30, रा. रामनगर, वर्धा), नितीन कळंबकर (वय 30, रा. स्टेशन फैल, वर्धा), सतीश येंडाळे (वय 26, शिवनी, जि. अकोला), अमोल कांबळे (वय 24, रा. चंदननगर, नागपूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. 

‘आयबी’ या विदेशी मद्याला केवळ हरियाणात विक्री करण्यात मान्यता आहे. तसे बॉटलवर स्पष्ट नमूद आहे. तरीदेखील ट्रकमध्ये तब्बल शंभर पेटी दारू भरून त्या यवतमाळात आणण्यात आल्या. डोर्ली येथील सुरक्षित स्थळावरून एक कार व पीकअप वाहनात हा माल भरणे सुरू असताना एक्साईजच्या पथकाला टीप मिळाली. त्यावरून त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. 

यावेळी सहाही जण ट्रकमधून दुसर्‍या वाहनात दारू भरत असताना मिळाले. त्यात सहा लाख 72 हजार रुपये किमतीची दारू, दहाचाकी ट्रक, पीकअप वाहन, कार, मार्बल पावडर असा एकूण 29 लाख 95 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपीया यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक आर. के. तायकर, निरीक्षक ए. वाय. खांदवे, एस. एम. मेश्राम, आर. एम. राठोड, एम. पी. शेंडे, एम. जी. रामटेके, बी. सी. मेश्राम आदींनी केली.
 
मार्बल पावडर वाहतुकीचा बनाव

दहा चाकी ट्रकमध्ये विदेशी दारू आणत असताना कुणालाही संशय येऊ नये म्हणून मार्बल पावडरदेखील भरण्यात आले होते. हरियाणातून निघालेला ट्रक सुरक्षित यवतमाळपर्यंत पोहोचला. मात्र, वर्धेत नेण्यासाठी दारू भरत असताना तस्करीचा पर्दाफाश झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT