Nagpur 
विदर्भ

नागपूरकरांनो सावधान! कोरोनाने घेतलाय वेग; 36 दिवसांत आढळले 1245 नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड गतीने वाढला आहे. 31 मे रोजी शहरात अवघे 531 कोरोनाबाधित रुग्ण होते. यानंतरच्या 36 दिवसांमध्ये त्यात जवळपास तीन पटीने म्हणजे 1245 कोरोनाबाधितांची वाढ झाली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये तर 200 बाधितांची भर पडली. त्यामुळे प्रशासनात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष असे की, जुन महिन्यात कोरोनाबाधितांसह कोरोनामुळे मृत्यूचा टक्काही वाढला होता. एप्रिलमध्ये अवघे 2 मृत्यू होते. मे मध्ये 9 जण दगावले तर 14 मृत्यू जून महिन्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. जुलैमध्ये आतापर्यंत एकजण दगावला आहे. पावसाळा हा ऋतू विषाणूंच्या पोषणासाठी पोषक असतो. यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

शहरात 11 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यावेळी विशिष्ट वसाहतीपुरता कोरोना मर्यादित होता. मात्र, इतक्‍या गतीने कोरोना पसरेल असे वाटत नव्हते. उपराजधानीतील सुमारे दीडशेपेक्षा जास्त वस्त्यांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष असे की, कोरोनाबाधित असताना आजाराची लक्षणे दिसत नसल्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच शहरात कोरोना वाढत आहे. पावसाळा असल्याने ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे अधिक जोखीम असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सांगितले. 

अनलॉक ठरू शकतो जीवघेणा 

लॉकडाउन संपले. त्यामुळे बाजारपेठा फुलत आहेत. गर्दी वाढत आहे. पावसाळा आहे. हवेत गारवा असतो. यामुळे हा महिना कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जोखमीचा आहे. केवळ महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडा, अन्यथा सामुदायिक प्रादुर्भाव झाल्यास सुरू असलेले अनलॉक जीवघेणे ठरू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

पावसाळ्यात गॅस्ट्रो, कावीळ तसेच मलेरियासह डेंगीचा उद्रेक होण्याची भीती असते. या आजारांमध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीचा ऱ्हास होतो. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर नेहमी करावा. हात स्वच्छ धुत राहावे. नाक, कान, डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळावे. लक्षणे दिसताच डॉक्‍टरांकडे जावे. 
डॉ. अर्चना देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल, नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT