All educational institutes will close till 31 july 
विदर्भ

विदर्भातील या जिल्ह्याने शाळा, शिकवणीवर्गांबाबत घेतला मोठा निर्णय...

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग 31 जुलैपर्यंत बंद असणार आहेत. याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात लागू केला आहे. परंतु, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवश्‍यक शैक्षणिक कामासाठी प्रत्यक्ष शाळा, विद्यालय, महाविद्यालय मुख्यालयी कर्तव्यावर उपस्थित राहतील.

चंद्रपूर जिल्हा कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा टप्याटप्याने सुरू करण्याबाबत स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक पातळीवरील प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्रित निर्णय घेऊन शासन परिपत्रकातील वेळापत्रकानुसार तसेच आदेशाचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्याबाबत कारवाई करण्याकरिता निर्देश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा : चक्‍क वाहतूक पोलिसांनीच नेमले वसुलीभाई, वाचा काय आहे प्रकार...

या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहितेचे कलमानुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. राज्य शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकांची बैठक घेतली. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या. तर, काही बंदच होत्या. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी शाळा सुरू वा बंदचा संभ्रम दूर करावा, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रमात आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील काही शाळा सुरू झाल्या. तर, अनेक शाळा बंदच आहेत. त्यामुळे अनेक पालकांमध्ये आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना निर्माण झाली होती.

पालकांमधील संभ्रम दूर करण्यात यावा, यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद किंवा सुरू करण्याबाबतचा निर्णय तातडीने जाहीर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने परिस्थितीची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर सोमवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT