file photo 
विदर्भ

चंद्रपुरातील "त्या' प्रकरणात पाचही आरोपींची निर्दोष सुटका

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : सन 2011 मध्ये हे प्रकरण उघडकीला आले. आरमोरी येथील संदीप आडे या व्यक्तीने येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. शिवजी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मुलीला भरती करून तिला सोडून गेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली.

रामनगर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. तेव्हा डॉ. ईशाद अली अकबर अली शिवजी यांनी चंद्रपुरातील सुमीत मेश्राम याला चार महिन्यांची ही बालिका पैशाच्या मोबदल्यात दिल्याचे समोर आले.

मात्र, आठ महिन्यांत मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे समोर आले. डॉ. शिवजी यांनी आपली फसवणूक केली अशा समजुतीवरून मेश्राम यांनी चार सप्टेंबर 2011 रोजी रात्री दीड वाजता खोटे नाव आणि पत्ता लिहून उपचाराच्या नावावर मुलीला डॉ. शिवजींच्या रुग्णालयात सोडून दिले, असे पोलिस तपासात समोर आले.

मुलगी घरीच जन्माला आल्याचा बनावट दाखला

मुलगी घरीच जन्माला आली, असा नगिनाबागचे तत्कालीन नगरसेवक देशक खोब्रागडे यांनी दाखला दिला. तो दाखलासुद्धा बनावट असल्याचे पोलिसांना आढळले. चौकशीअंती डॉ. ईशाद शिवजी आणि सुमीत मेश्राला अटक करण्यात आली. देशक खोब्रागडे यांनी अटकपूर्व जामीन मिळविला. डॉ. सिद्दीका शिवजी आणि तृप्ती मेश्राम पोलिसांच्या हाती लागल्या नाही.

एकूण 17 साक्षीदार तपासले

या प्रकरणी 15 नोव्हेंबर 2011 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. डॉ. खोब्रागडे यांची दाखल्यावरील स्वाक्षरी, प्रिस्क्रिपशनवरील डॉ. शिवजींचे हस्ताक्षर यांचा अहवाल फोरेन्सिक लॅबमधून निगेटिव्ह आला. याप्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर उपरोक्त पाचही जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

वरिष्ठ न्यायालयात अपील करणार

सरकारी वकील ऍड. संदीप नागापुरे यांनी निकालपत्र वाचल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेऊ असे "सकाळ'शी बोलताना सांगितले. आरोपींची बाजू ऍड. खजांजी, ऍड. सुनील हस्तक आणि सुनील पुराणिक यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT