almost 13 hundred babies died in nagpur division 
विदर्भ

बापरे! पूर्व विदर्भातील १ हजार २८३ चिमुकल्यांनी पाहिला नाही पहिला वाढदिवस

केवल जीवनतारे

नागपूर : गेल्या ९ महिन्यांमध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये १ हजार २८३ चिमुकल्यांनी पहिला वाढदिवसही बघितला नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार करता ३०८ चिमुकले दगावले असल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. कोरोनाच्या संकटासह कोवळ्या पानगळीचेही संकट कायम आहे. 

मध्य भारतात मेडिकल हब म्हणून नागपूरचा विकास होत असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नाही. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात १ हजार २८३ मुले जन्मानंतर एका वर्षाच्या आत दगावली आहेत. गर्भवती माता आणि मुलांच्या संगोपनासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत बाळंतपणात एकही माता उपचाराअभावी दगावता कामा नये, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, तरीही माता मृत्यूच्या दरात पाहिजे ती घट झाली नाही. 

जिल्हानिहाय मृत्यूसंख्या - 

जिल्हा मृत्यूसंख्या
नागपूर ३०८
चंद्रपूर २८४
गडचिरोली २७४ 
भंडारा १६८
गोंदिया १४५
वर्धा १०४

सध्या स्थितीत बालमृत्यूंवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूची कारणे अनेक आहेत. कमी वजनाचे तसेच अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्माला आल्यानंतर धोका असतो. कुपोषण, न्यूमोनिया, जंतू संसर्ग तसेच अतिसार आणि श्‍वसनाचे विकार बालमृत्यूस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. 
-डॉ. अविनाश गावंडे, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, नागपूर. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT