unemployment.jpg 
विदर्भ

चिंताजनक : आधिच ग्रामीण भागात बेरोजगारी; त्यात आता यांची पडतेय भर!

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात दिवसेंदिवस महानगरांतून येणार्‍यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे स्थानिक युवक कामांअभावी बेरोजगार आहेत. त्यातच आता महानगरांतून मजुरांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे परतत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर बेरोजगारीच मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कारण, जिल्ह्यात उद्योग-धंद्यांचा अभाव आहे. तसेच उन्हाळा असल्यामुळे शेतीची कामे सुद्धा बंद आहेत. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिवसेंदिवस राज्यभरात कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर गेलेले नागरिक घराकडे परत येत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसली तरी सुद्धा त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवसांकरिता गृहविलगीकरणात ठेवले जात आहे. तसेच या नागरिकांकडून गृहविलगीकरणाचे उल्लंघन होणार नाही, याकडे ग्रामसमितीच्या माध्यमातून लक्ष दिल्या जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर उद्योग धंद्यांचा अभाव आहे. तालुक्याच्या ठिकाणचे औद्योगीक क्षेत्र ओस पडलेले आहेत. 

जिल्ह्याच्या ठिकाणी बोटावर मोजण्याइतपत लघू उद्योग सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरीलच बेरोजगारांकडून असलेली रोजगाराची मागणी पूर्ण होत आहे. त्यातच आता महानगरांतून कामानिमित्त गेलेले लोंढेच्या लोंढे गावाकडे परत येत आहेत. मात्र, हाताला कामच मिळणार नसल्यामुळे पुढील दिवस कसे काढायचे? याची चिंता या मजुरांना लागली आहे. कारण, सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतीची कामे सुद्धा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे स्थिती
गृह विलगीकरण ............57
संस्थात्मक विलगीकरण.....17
आयसोलेशन कक्षात .......06
तपासलेले एकूण नमुने ...102
पॉझिटिव्ह अहवाल.........03
निगेटिव्ह अहवाल .........94
अहवाल अप्राप्त ........... 05

बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर
कारंजा येथील दोन व महानगरांतून आलेल्या तीन रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने आज (ता.15) तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशीम

कोरोना बाधिताची प्रकृती स्थिर
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसेलेशन वॉर्डमध्ये कोरोना बाधित एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT