Amol Mitkari car attacked by mns esakal
विदर्भ

"कष्टकरी घरातील मुलगा गेला, राज ठाकरेंनी मुंबई सोडून..."; कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याच्या निधनानंतर मिटकरी काय म्हणाले?

Amol Mitkari car attacked by MNS workers in Akola: तोडफोडीच्या काही तासांनंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि त्यांना अकोल्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Sandip Kapde

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (राकांपा) विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची अकोल्यात तोडफोड केली. पुण्यातील पुरावरुन राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असा वाद निर्माण झाला. राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर अमोल मिटकरींनी पलटवार केला.  

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला. ही टीका मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागली. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेत सहभागी असलेल्या मनसे कार्यकर्त्यांपैकी जय मालोकर (२४) याचा हृदयविकाराने अकोला येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी अकोला जिल्हा महिला शाखा अध्यक्षा सह १३ मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गैरकायदेशीर जमाव, जखम आणि आगजनीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

राज ठाकरे आणि मिटकरी यांच्यातील वाद-

राज ठाकरे यांनी अलीकडेच झालेल्या पुण्यातील पुरामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार पुण्यात नसताना धरण भरलं कसं, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर पलटवार करत मिटकरी यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील सुपारीबाज व्यक्ती म्हटले होते. याच कारणामुळे अकोला येथील सरकारी अतिथिगृहाजवळ ३० ते ४० मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या कारची तोडफोड केली.

मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू-

तोडफोडीच्या काही तासांनंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि त्यांना अकोल्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ईसीजी रिपोर्टमध्ये हृदयविकाराची पुष्टी झाली आणि उपचारांच्या प्रक्रियेपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अमोल मिटकरींची प्रतिक्रिया-

मिटकरी म्हणाले, "एका कष्टकरी घरातील मुलगा गेला. मी त्या कुटुंबाची भेट घेईन. माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडून इथं यावं. सर्वसामान्यांचा राजकारणात जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण आहे? माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कमोडिटी बाजारात सोनं-चांदी स्वस्त, पण सराफा बाजारात काय? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर!

DA Hike 2026: महागाई भत्ता वाढीची आज घोषणा? केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे, दिवाळीची भेट मिळणार की ?

'नाण्याची दुसरी बाजू!' ‘आमने सामने’च्या कलाकारांना का काढलं? लीना भागवत यांनी सांगितलं कारण, Video Viral

Marathi News Live Updates : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांचा विजय, सोलापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण करत जल्लोष

FASTag Annual Pass : टोल नाक्यापासून २० किमी परिसरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा! हजारो रूपये वाचणार; १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT