अमरावती : फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर छायाचित्रकाराने लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेच्या पालकांनी बडनेरा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी योगेश जगदेव शेगोकार (वय ४४, रा. पाचबंगला, बडनेरा) विरुद्ध गुन्हा दाखल केला.
पीडित युवती फोटो काढण्यासाठी बडनेरा हद्दीतील एका फोटो स्टुडिओमध्ये गेली होती. तेथे संशयित आरोपीने तिला फोटो काढण्याच्या बहाण्याने आत नेले व अश्लील चाळे केले. त्यानंतर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे. पीडितेने घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. पालकांनी पीडितेसह बडनेरा ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. प्रकरणी बडनेरा पोलिसांनी संशयित योगेश शेगोकार विरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
अनैसर्गिक अत्याचाराचे रेकॉर्डिंग
पत्नीसोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करून पतीनेच त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले व चारित्र्यावरही संशय घेतल्याचा गंभीर आरोप विवाहितेने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याला या कामात मदत केल्याप्रकरणी एक महिला, अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
युवकाकडून विद्यार्थिनीचा पाठलाग
यशोदानगर परिसरात शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा संशयित आशिष बोरकर (वय ३०) याने गत तीन महिन्यांपासून पाठलाग सुरू ठेवला होता. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.