murder 
विदर्भ

अल्पवयीन प्रेयसी घरी एकटीच असल्याचे पाहून प्रियकराने साधला डाव...

सकाळवृत्तसेवा

अमरावती/दर्यापूर : दर्यापूर तालुक्याच्या लेहगाव रेल्वेत प्रेमप्रकरणातून युवकाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून गुप्तीने सपासप वार करून तिचा खून केला, त्यानंतर स्वत:वरही त्याच गुप्तीने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी या घटनेबाबत सांगितले.

प्रवीण बंडू कावणपुरे (वय २५ रा. लेहगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. जखमीवर अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीणचे गावातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. युवतीने ही बाब आपल्या पालकांना सांगितली होती. युवतीच्या पालकांसह काही निवडक नातेवाइकांनी प्रवीणची समजूत घातली होती.

युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, रविवारी (ता. १९) मुलगी एकटीच घरी होती. आईवडील बाहेर गेले होते. ही संधी साधून सकाळी अकराच्या सुमारास प्रवीण तिच्या घरी गेला. अचानक प्रवीणने रागाच्या भरात स्वत:जवळच्या गुप्तीने आधी मुलीच्या पोटावर व नंतर गळ्यावर वार केले. त्यात पीडिता गंभीर जखमी झाली. त्यानंतर प्रवीणने स्वत:चाही गळा त्याच गुप्तीने कापला, पोटात सुद्धा जखमा करून घेतल्या. लॉकडॉउनमुळे बराच वेळपर्यंत शेजाऱ्यांनाही या घटनेची कल्पना नव्हती. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच, युवतीच्याच घरात पडून असलेल्या दोघांना उपचारासाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे युवतीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याया प्रवीण कावनपुरे याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर, मृत युवतीचे आईवडील गावी परतल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.

प्रेमप्रकरणात दहा दिवसांपूवी ब्रेकअप झाला. त्यातून चिडलेल्या प्रवीण कावनपुरे याने त्या मुलीची हत्या केल्याची बाब प्रथमदर्शनी पुढे आली आहे. त्या घटनेचे बारकावे तपासल्या जातील.
- डॉ. हरिबालाजी एन., पोलिस अधीक्षक, अमरावती.

पोलिस सुरक्षेत नागपूरला हलविले
इर्विनमध्ये उपचार घेणाऱ्या जखमी आरोपी प्रवीण कावनपुरे याच्यासोबत त्याचे सहा नातेवाईक हजर होते. जखमी प्रवीणचा मोबाईल स्थानिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT