amravati citizens stucked in other state due to lockdown 
विदर्भ

परप्रांतात अडकले अमरावतीचे नागरिक, ही आहे संख्या...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्यात आणि देशात लॉकडाउन घोषित झाल्यापासून परप्रांतीय नागरिक जिल्ह्यात तर जिल्ह्यातील नागरिक परप्रांतात अडकून पडलेले आहेत. त्यांनी प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितलेली आहे.

जिल्ह्यात अडकून पडलेल्या 534 नागरिकांनी आपापल्या गावी जाण्याची तर तब्बल 534 नागरिकांनी परप्रांतातून जिल्ह्यात परतण्याची परवानगी मागितलेली आहे. काहींनी त्यांच्या वाहनाचे क्रमांक प्रशासनाकडे नोंदविलेले आहेत. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये अमरावतीकर आहेत. त्यांना आपल्या मूळगावी यायचे आहे, तर अमरावतीतसुद्धा काही परप्रांतीय आहेत. त्यांना आपापल्या राज्यात परत जायचे आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर काही नागरिकांनी जिल्ह्यातच एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी परवानगी मागितलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 14) दुसरा लॉकडाउन 3 मेपर्यंत घोषित केलेला आहे. काही भागांत सूट देण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात आहेत. त्या बहुदा 20 एप्रिलपर्यंत जाहीर होऊ शकतात. त्यानुसार संबंधितांना परवानगी दिली जाण्याची शक्‍यता आहे. अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने चालविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT