Bachchu Kadu Esakal
विदर्भ

Amravati: जिल्हा रुग्णालयाची आमदार बच्चू कडूनी घेतली झाडाझडती दुरवस्था पाहून संतापले

आमदार बच्चू कडू यांनी घेतली इर्विनची झाडाझडती

सकाळ डिजिटल टीम

अमरावती: दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.१०) सायंकाळी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला (इर्विन) भेट दिली. येथील दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.

अचानक भेट दिल्याने या रुग्णलायात काही काळ तारांबळ उडाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे उपस्थित होते. दिव्यांग रुग्णांच्या वॉर्डात त्यांनी भेट दिली. काही बेडवर दोन दोन रुग्ण पाहून त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला.

मागील काही महिन्यांपासून हाडाशी संबंधित आजार असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातून काही रुग्णांना पीडीएमसीमध्ये हलविले जाते. त्याबाबत त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सौंदळे यांना विचारणा केली. त्यांनी त्यासंदर्भात तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

त्यावरही आमदार कडू यांनी जाब विचारला. कारण जिल्हा सामान्य रुग्णालयातून जर क्षुल्लक कारणासाठी अस्थिव्यंग रुग्ण बाहेर रुग्णालयात रेफर होत असतील तर येथील व्यवस्था काय कामाची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अचानक भेटीमुळे मात्र डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर वॉर्डात सुद्धा आमदार कडू यांनी भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT