विदर्भ

अमरावतीचा समावेश फेज ३ मध्ये; सोमवारपासून जिल्हा ‘अनलॉक’

सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्याचा समावेश फेज तीनमध्ये (Amravati district included in phase three) करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. ७) जिल्ह्यामध्ये अनलॉक (Amravati district unlocked from Monday) करण्यात येणार असून, जिल्हावासीयांना आणखी दिलासा मिळणार आहे. हॉटेल उपाहारगृहांसोबत मॉनिंग वॉक, जिम, लग्नसमारंभाना परवानगी देण्यात आली आहे. (Amravati district included in phase three)

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निकषांनुसार अमरावती जिल्ह्याचा समावेश फेज तीनमध्ये झाला असून, आता सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सर्व प्रकारच्या दुकानांना सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत क्रीडांगणे, उद्याने, बगीच्यांमध्ये मॉनिंग वॉकला सुद्धा परवानगी राहणार आहे. किराणा दुकाने, दुग्धालये, डेअरी, व्यायामशाळा, स्पा, बाह्य मैदानी खेळ, कृषी दुकानांना वाढीव वेळेत परवानगी राहणार आहे. रुग्णांची पॉझिटिव्हीटी तसेच ऑक्सिजन बेडसचा वापर, राज्य सरकारकडून अनलॉकसाठी घालून दिलेल्या या निकषांप्रमाणे अमरावीत जिल्ह्याचा समावेश फेज तीनमध्ये झाला आहे. त्यानुसार शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नवीन अध्यादेश काढला.

काय मिळणार दिलासा

फेज तीनचा विचार करता सध्या सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत व्यापार, व्यवसाय करण्यास परवानगी आहे. ती वाढवून दुपारी ४ पर्यंत करण्यात आली आहे. हॉटेल उपाहारगृहांना सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ५० टक्के आसन क्षमतेसह परवानगी राहणार आहे. मध्यागृहे, बारसाठी घरपोच सेवा याच वेळेत राहील.

आंतरजिल्हा वाहतुकीला हिरवी झेंडी

आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. मात्र, २० टक्के अधिक पॉझिटिव्हीची असलेल्या जिल्ह्यामधून येणाऱ्यांना ई-पासची गरज राहणार आहे.

लग्नसमारंभांना ५० लोकांची परवानगी

लग्न समारंभांना ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सभा, बैठका, सहकारी संस्थांची आमसभा यांच्यासाठी सुद्धा हाच निकष लागू राहील.

दर आठवड्याला आढावा

पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची रिक्तता या निकषांच्या आधारावर जरी दिलासा देण्यात आला असला तरी प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा राज्यस्तरावर घेतला जाईल तसेच परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कठोर किंवा शिथिल करण्यात येणार आहेत.

(Amravati district included in phase three)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT