farm sakal
विदर्भ

अमरावती : शेतात वीज पडली; दहा जण थोडक्यात बचावले

शेतात वीज पडल्यावरही आम्ही सर्व जण थोडक्यात बचावलो. ही ईश्‍वराची कृपा आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना हिवरखेड नजीक घडली. शेतात वीज पडल्याने शेतकरी व शेतमजूर असे दहा जण बाल बाल बचावले. मात्र, शेतातील सिंचन साहित्य, मोटार व विद्युत जोडणीसह मीटर जळून खाक झाले.

मागील काही दिवसांपासून हिवरखेडसह संपूर्ण जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. त्यातच विजांचा प्रचंड कडकडाटसुद्धा सुरू होता. ता. ७ सप्टेंबर रोजी पावसाने थोडी विश्रांती घेतल्‍याने शेतकरी गणेश रेखाते हे दहा मजुरांसह संकट मोचन हनुमान मंदिर नजीकच्या मोराडी परिसरात आपल्या शेतात टोमॅटो पिकाची लाकडी काड्यांनी बांधणी करीत होते.

मीटर घराजवळ काठ्यांची साठवण केलेली होती. तेथून सर्व मजूर काठ्या घेऊन जात होते आणि पिकांची बांधणी करीत होते. तेवढ्यातच दुपारी एक वाजेच्या दरम्यान वातावरण बदलले आणि पुन्हा जोरदार मेघगर्जनेसह तुफान वारा वादळ पाऊस सुरू झाला. त्यातच विजांचा प्रचंड कडकडाट सुद्धा सुरू झाला. एक मोठी वीज विद्युत खांबा जवळ कोसळली. ज्यामध्ये विद्युत खांब निकामी झाले. मीटर घर, सर्व्हिस लाईन, बोरवेल मशीन, इलेक्ट्रिक केबल, इत्यादी साहित्य स्वाहा झाले. शेतकऱ्याचे आणि महावितरणचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून, शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी, मागणी त्यांनी केली आहे.

शेतात वीज पडल्यावरही आम्ही सर्व जण थोडक्यात बचावलो. ही ईश्‍वराची कृपा आहे. परंतु, बोअरवेल मशीनसह जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

- गणेश रेखाते, शेतकरी, हिवरखेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT