खून sakal
विदर्भ

अमरावती : दोघा भावांच्या भांडणात पित्याचा खून

भातकुली तालुक्यातील आबीदपूर येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दोघा भावांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पित्याला जीव गमवावा लागला. मोठ्या मुलाने नाकावर जबरदस्त मारलेल्या ठोश्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

वलगाव पोलिस ठाण्यांतर्गत भातकुली तालुक्यातील आबीदपूर येथे ही घटना सोमवारी (ता. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. महादेव तायडे (वय ७०), असे मृत पित्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तायडे रात्री मद्यप्राशन करून आल्याने त्याचे लहान भाऊ दीपक तायडे यासोबत भांडण झाले. मद्यप्राशन करून आलेल्या ज्ञानेश्वरला त्याने घराबाहेर जाण्यास सांगितले. यावरून त्यांच्यातील वाद विकोपास गेला.

उभयतांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. दरम्यान वडील महादेव तायडे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता ज्ञानेश्वरने त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्याने ते जखमी होऊन खाली पडले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वलगाव पोलिसांनी याप्रकरणी लहान मुलगा दीपक तायडे याच्या फिर्यादीवरून खुनाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले असून ज्ञानेश्वर तायडे यास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT