विदर्भ

अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत आवाहन केलेले आहे. परंतु तरीही बेशिस्त वर्तन करणाऱ्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

बेशिस्त वर्तन ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच जनजागृतीचा एक भाग म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कोरोनाची प्रतिकृती तयार केली. त्याद्वारे हात स्वच्छ धुणे, चेहऱ्याला मास्क लावणे, हात सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ करणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळणे, याबाबत शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांसोबत कोरोनाची प्रतिकृती धारण केलेल्या व्यक्तीकडून याबाबी नागरिकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू केला.

सोमवारी (ता. 26) राजकमल चौक, जयस्तंभ, पंचवटी, शेगाव नाका चौकात वाहतूक पोलिसांसोबत प्रतिकृती धारण केलेल्या व्यक्तीने नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात वाहतूक पोलिसांसह ठाण्याच्या स्तरावरूनसुद्धा 45 नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले. जिल्ह्याच्या सीमांवरही तशीच देखरेख सुरू आहे. त्यापैकी महत्त्वाच्या तपासणी नाक्‍यांवर कोरोनाच्या प्रतिकृतीसह पोलिस आपले दैनंदिन कर्तव्यसुद्धा पार पाडणार आहे.

पंधरा दिवसांच्या संचारबंदीनंतर पूर्वीप्रमाणे पोलिस कर्मचारी, अधिकारी हे रस्त्यावरच आहेत. वाहनांची तपासणी तसेच बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई शहराच्या विविध कानाकोपऱ्यांत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त किशोर सूर्यवंशी, श्री. अवचार व प्रवीण काळे यावेळी उपस्थित होते.

उपचार घेत असतानाच स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या आरोग्य व पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे.
-प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : मुलुंड आणि भांडुप मधील मेट्रो चारच्या स्पेशल स्टील स्नॅप बसवण्याकरता पुढील दोन दिवस हा रस्ता मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत दोन दिवस बंद असणार

SCROLL FOR NEXT