Amravati residents want relaxation in lockdown 
विदर्भ

अमरावतीकरांना हवी लॉकडाउनमध्ये शिथिलता; यशोमती ठाकूर यांनी केली मुख्यमंत्र्यांना विनंती

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील नियंत्रित असलेली कोरोना रुग्णसंख्या, यापूर्वी लावण्यात आलेला लॉकडाउन, कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी व नागरिकांकडून मिळत असलेले सहकार्य या सर्व बाबींचा विचार करता अमरावती जिल्ह्यापूरते लॉकडाउन शिथिल करण्याची मागणी अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

फेब्रुवारी तसेच मार्च या दोन महिन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात राज्याच्या तुलनेने सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २० फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान कठोर लॉकडाउन लावण्यात आला होता. त्यावेळी कोरोना रुग्णसंख्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. मात्र, सद्यःस्थितीत रुग्णसंख्येमध्ये घट झालेली असून ती नियंत्रित स्वरूपात पाहायला मिळत आहे.

असे असले तरी राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध अमरावतीकरांवरही लादण्यात आले आहेत. लॉकडाउनमुळे व्यापारी, किरकोळ विक्रेते तसेच जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणावर निवेदने दिली जात आहे. याशिवाय शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणीसुद्धा सुरू ठेवली आहे.

फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यांत दररोज सरासरी असलेली ६०० ते ८०० ही रुग्णसंख्या आता २०० ते २५० पर्यंत खाली आलेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अमरावती जिल्ह्यासाठी लॉकडाउनमध्ये शिथिलता देऊन आस्थापनांना परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT