Amravati school will participate in the national seminar 
विदर्भ

अमरावतीच्या शाळेची राष्ट्रीय स्तरावर दखल, महाराष्ट्रातील एकमेव शाळा

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : शैक्षणिक धोरण व कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशासन संस्थानच्या (निपा) राष्ट्रीय चर्चासत्रासाठी राज्यातून दि. गुजराती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मणिबाई गुजराती हायस्कूल या एकमेव शाळेची निवड झाली आहे. 

राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्याचा शाळेला सलग दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. आगामी १७ डिसेंबर रोजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली  देव राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होऊन कोरोना काळातील शैक्षणिक कार्यपद्धतीबाबत माहिती सादर करणार आहेत.

मणिबाई गुजराती हायस्कूलच्या 'पिंक रूम' उपक्रमाची गतवर्षी राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशासन संस्थानने दखल घेतली होती. गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात मुख्याध्यापिका अंजली देव यांनी सादरीकरण केले होते. यानंतर यावर्षी देखील मणिबाई गुजराती हायस्कूलला राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी करण्यात आले आहे. 

हेही वाचा - मातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे

यासंबंधीचे पत्र अंजली देव यांना निपाच्या संयोजिका डॉ. सुनीता चुंघ यांनी पाठविले आहे. निपाच्या चर्चासत्रात देशाच्या पाच राज्यातील पाच शाळांचा समावेश असून, मणिबाई गुजराती शाळा महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे. मणिबाई गुजराती शाळेचे कोरोना संक्रमण काळातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम व अन्य शैक्षणिक विकासात्मक कामांची दखल घेऊन निपा संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड केली आहे. 

कोरोना संक्रमणामुळे यावर्षी ऑनलाईन चर्चासत्र होणार आहे. मुख्याध्यापिका अंजली देव कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितार्थ राबविलेल्या उपक्रमाच्या माहीतीचे सादरीकरण करणार आहेत. १७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात मणिबाई गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांच्यासह राजस्थानच्या उदयपूर, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश व आसाम राज्यातील चार शाळांचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्याचे सादरीकरण करणार आहेत.

गतवर्षी शाळेद्वारे पिंक रूमची संकल्पना अस्तित्वात आणली होती. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. यावर्षी शाळेद्वारे कोरोना संक्रमण काळात देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची कामगिरी उत्तमपणे बजावली.  याची दखल निमाने घेतली आहे. दरम्यान निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात राज्यातून मणिबाई गुजराती शाळेला सादरीकरणाचा मान मिळाला आहे. 

याबद्दल मुख्याध्यापिका अंजली देव यांनी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पोपट, उपाध्यक्ष दिलीप वस्तानी, सचिव परेश राजा, कोषाध्यक्ष तुषार श्रॉफ, सहसचिव हर्षद उपाध्याय, माजी अध्यक्ष मुकेश गगलानी यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे आभार मानले आहे. संस्थेचे संस्थेच्या कार्यकारिणीने मुख्याध्यापिका अंजली देव यांचे अभिनंदन केले.
 

पिंक रूम उपक्रमाचे सादरीकरण

पिंक रूमच्या नावीन्यपूर्ण व अत्यावश्यक उपक्रमाच्या माध्यमातून मणिबाई गुजराती हायस्कूलने राष्ट्रीय पातळीवरील चर्चेत सहभागी होण्याचा मान मिळविला होता. पिंक रूमचा उपक्रम देशभरातील अन्य शाळांनी राबविण्यासाठी निमा आग्रही आहे. १७ तारखेला होणाऱ्या निमाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पिंक रूमचे सादरीकरण काण्यावर निमाच्या आयोजकांनी भर दिला आहे.

 
अमरावती राष्ट्रीय पातळीवर

पिंक रूमच्या माध्यमातून मणिबाई गुजराती शाळेने गतवर्षी राष्ट्रीय पातळीवर नव्या उपक्रमाचे सादरीकरण केले होते. यावर्षी निपाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पुन्हा शाळेची निवड झाल्याने अमरावती राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. मणिबाई गुजराती शाळेच्या शैक्षणिक कार्याबद्दल समाजातून अभिनंदन होत आहे.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सवर दुःखाचा डोंगर; संघातील सदस्याच्या मुलीचा मृत्यू... तिच्यासाठी दंडावर काळी पट्टी बांधून खेळणार

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

SCROLL FOR NEXT