Dr. Dhande 
विदर्भ

अमरावती शिक्षक मतदारसंघात डॉ. नितीन धांडे भाजपचे उमेदवार 

सुधीर भारती

अमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने अमरावतीच्या डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.

डॉ. नितीन धांडे हे विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच अधिकृतपणे आपला उमेदवार रिंगणात उभा केला आहे. यासोबतच राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीचे उमेदवार मंगळवारी (ता.१०) जाहीर होणार आहेत.

राष्ट्रीय पक्ष प्रत्यक्षपणे शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरल्याने उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस वाढण्याचे संकेत आहेत. डॉ. नितीन धांडे हे गेल्या सहा वर्षांपासून विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेनंतर ही सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था आहे. 
 
`मध्ये आलास तर तिला  पेट्रोल टाकून जाळेन`; युवतीच्या भावाला दिली धमकी
 

आतापर्यंत ४० जणांनी उचलले अर्ज 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सहा नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली. सोमवारी (ता. ९) अर्जांची उचल केलेल्यांमध्ये किरण रामराव नाईक, सतीश माधव काळे, डॉ. नितीन धांडे, रामदास गंगाराम इंगळे, भाऊराव सरकटे, डॉ. नितीन गणपत चवाळे यांचा समावेश आहे. यासोबतच आतापर्यंत अर्ज उचलणाऱ्यांची संख्या ४० झाली आहे. 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT