theft Sakal
विदर्भ

चोराला पकडायला पोलिस येताच 'त्याने' मारली माडीवरून उडी

पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता सापळा रचला, दारापुढे पोलिस येताच त्याने माडीवरून उडी मारली आणि पळ काढून पोलिसांना चकमा दिला.

प्रशिक मकेश्वर.

तिवसा (जि. अमरावती) : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) अनेक चोरीत समावेश असलेला अट्टल चोर गेल्या काही महिन्यांपासून शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहत असल्याची माहिती नागपूर पोलिसांना (Nagpur Police) मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता सापळा रचला, दारापुढे पोलिस येताच त्याने माडीवरून उडी मारली आणि पळ काढून पोलिसांना चकमा दिला. एखाद्या चित्रपटाला शोभेल, असा प्रकार काल परिसरातील काहींनी अनुभवला. (Nagpur Crime News)

येथील काही युवकांशी मैत्री करून या चोरट्याने रूम भाड्याने घेतली होती. येथूनच तो चोरीचे प्लॅनिंग करीत असल्याची माहिती समोर आली. आधी तीन जण एकाच रूमवर राहत होते. मात्र काही दिवसांनी दोघे निघून गेले. परिसरातील काही मुलांशी मैत्री करून त्याने आपला संपर्क वाढविला. मोठा चोर आपल्यात राहत असल्याची कुणाला कल्पनाही त्याने येऊ दिली नाही.

परिसरात राहून येथील युवकांना पैशाची व इतर मदत करून त्यांना जवळ करण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र हे यश जास्त दिवस टिकू शकले नाही. दुसऱ्याच्या फोनवरून आपल्या साथीदारांना फोन करण्याच्या नादामुळे याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि काल नागपूर पोलिसांनी मध्यरात्री तिवसा शहर गाठले.

पोलिसांनी फोनच्या लोकेशनने शहरातील आनंदवाडी, शिक्षक कॉलनी परिसर पिंजून काढला. एका युवकाच्या घरी जाऊन फोन ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता युवकाने त्याची माहिती दिली व पोलिसांनी त्या घराला घेरावा घातला. युवकाच्या मदतीने त्याला आवाज दिला. मात्र बाहेर पोलिस असल्याची भनक लागताच त्याने माडीवरून उडी घेत अंधारातून पळ काढला. पोलिसांनी काही तास अंधारात शोध घेतला. मात्र तो हाती न लागल्याने पोलिसांना आल्या पावली परत जावे लागले.

फोनवरून लागला सुगावा

आशिष कधीच स्वतःच्या फोनवरून आपल्या साथीदारांना फोन करीत नव्हता. येथील युवकांच्या वेगवेगळ्या फोन वापरून फोन पेच्या माध्यमातून पैसे मागवून येथील युवकांवर खर्च करून त्याने अनेकांना आपल्या जवळ केले होते. फोनवरून पैशाच्या देवाण-घेवाणीमुळे त्याचा सुगावा नागपूर पोलिसांना लागला असावा, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT