amravati zp help to child of farmer who committed to suicide in amravati 
विदर्भ

आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी थेट मदत, जिल्हा परिषदेचा विदर्भातील पहिलाच प्रयोग

सुधीर भारती

अमरावती : अमरावती जिल्हापरिषदेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. जिल्हापरिषदेच्या स्वनिधीतून प्रभावित कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजाराची शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे विदर्भातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही केला जात आहे. 

सामान्यपणे जिल्हापरिषद म्हणजेच राजकारणाचा अड्डा. राजकीय डावपेचांचे सत्ताकेंद्र. मात्र, ही ओळख अमरावती जिल्हापरिषदेने काहीशी पुसली आहे. केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारणातसुद्धा आपण पुढे असल्याचे जिल्हापरिषदेने दाखवून दिले आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरू आहे. मात्र, घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने मुलांचे भवितव्य अंधारात लोटले जाते.

सामान्यपणे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, त्याचा फायदा सहसा त्या कुटुंबातील मुले किंवा मुलींच्या शिक्षणासाठी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा करिअर सोडावे लागते. हीच अडचण लक्षात घेऊन जिल्हापरिषदेच्या कृषी समितीचे सदस्य प्रकाश साबळे यांनी पाठपुरावा करीत जिल्हापरिषदेच्या स्वनिधीतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 20 लाख रुपयांच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडून सहकार्य मिळाले. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून प्रथम टप्प्यात 50 कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.  

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. विदर्भात पहिल्यांदाच जिल्हापरिषदेच्या स्वनिधीतून ही मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- प्रकाश साबळे, कृषी समिती सदस्य, जिल्हा परिषद, अमरावती  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT