विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; चंद्रपूर जिल्ह्यातील मारोडा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : आंबे (Mangoes) तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला (Tiger attack) करून ठार केल्याची घटना रविवारी सकाळी सोमनाथ येथील कम्पार्टमेंट नं. ७२९ मध्ये घडली. मृताचे नाव मनोहर आडकुजी प्रधाने (वय ६८) आहे. (An old man was killed in a tiger attack in Chandrapur)

मारोडा येथील मनोहर प्रधाने हे रविवारी सकाळी एकटेच आंबे तोडण्यासाठी सोमनाथ येथे गेले होते. सोमनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या नाल्याच्या शेजारी ते आंबे तोडत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घालून जागीच ठार केले. दुपार झाल्यानंतरही घरी न परतलेल्या मनोहरला शोधण्यासाठी नातेवाईक गेले असता त्यांना त्यांचा मृतदेहच आढळला. त्यांच्या शेजारी आंबे तोडलेली पिशवीही सापडली.

सोमनाथचा परिसर हा बफर झोनमध्ये येतो. या वाघाचा मुक्त संचार आहे. सोमनाथ मंदिर, आमटे फॉर्म मार्ग आणि शेतकी शाळेच्या परिसरात भरदिवसा वाघाचे अनेकांना दर्शन झाले आहे. घटना माहीत होताच मूल येथील बफरचे वनपरिक्षेत्राधिकारी मनोहर नायगमकार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. वनरक्षक, वनपाल यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. नुकतेच जानाळा येथील तिघांचा वाघाच्या हल्यात बळी गेला होता. मूल तालुक्‍यात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्‍यता आहे.

(An old man was killed in a tiger attack in Chandrapur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT