जिवती,(जि. चंद्रपूर) : कोंडवाड्यात ठेवण्यात आलेली जनावरे. 
विदर्भ

छत्र नसलेल्या कोंडवाड्यात चारा-पाणी, अस्वच्छतेमुळे जनावरांचा कोंडमारा

सकाळ वृत्तसेवा

जिवती,(जि. चंद्रपूर) : नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यात आलेली जनावरे न्याय प्रविष्ठ आहे. त्यामुळे पकडण्यात आलेली जनावरे कोंडवाड्यातच श्‍वास घेत आहेत. चारा, पाणी, आरोग्य व अस्वच्छतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. जनावरांच्या मलमूत्रामुळे परिसरातील नागरिकांचेही आरोग्य बिघडत चालले आहे. छत्र नसलेल्या कोंडवाड्यात जनावरांचा कोंडमारा होताना दिसत आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांचे हाल होतात. ताब्यात देण्यात आलेल्या 22 जनावरांपैकी सहांचा मृत्यू झाला. कोंडवाड्यातील जनावरे मोकळा श्‍वास कधी घेतील, असा प्रश्‍न स्थानिकांकडून विचारला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाला पोलिसांनी अडविले. जनावरांचा जीव वाचला.

तब्बल 22 जनावरे निर्दयीपणे भरून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही जनावरे नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, जनावरांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाले. त्यातील सहा जनावरांचा मृत्यू झाला. कोंडवाडा रक्षकाचे कुठलेही पद मंजूर नाही. नगरपंचायतीच्या सफाई कामगारांकडूनच जनावरांना चारा, पाण्याची सोय केली जाते.मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांची सोय करण्यास सफाई कामगारांना नाकीनऊ येणार आहे.

नगरपंचायतीकडे स्वतंत्र कोंडवाडा नाही. पर्यायाने कोंडवाडा रक्षकाचे पद नाही. गोवंशाचे हाल होत आहे. 22 पैकी सहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पोलिस प्रशासनातर्फे गोवंशाच्या निवासासाठी न्यायालयात पत्र व्यवहार करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची तजवीज केली जाईल, असे प्रशासकीय अधिकारी वरद थोरात यांनी सांगितले.


गोरक्षण संस्थेशी आपण संपर्कात आहोत. त्यांच्याकडे गोवंश ठेवण्याची व्यवस्था नाही. जागा उपलब्ध होताच गोवंश सुरक्षित ठिकाणी हलविल्या जाईल.
विश्‍वास पुल्लरवार, सहायक पोलिस निरीक्षक जिवती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT