Ankita had mentioned the name of the accused Hinganghat fire case 
विदर्भ

हिंगणघाट जळीतकांड : अंकिताने सांगितले होते आरोपीचे नाव; पहिल्या दिवशी नोंदविली तिघांची साक्ष

रूपेश खैरी

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांडाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सोमवारपासून (ता. ११) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सरकारी पक्षाच्या वतीने तिघांची साक्ष नोंदविण्यात आली. उद्या आणखी काहींची साक्ष नोंदविण्यात येणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. आज हजर झालेल्या साक्षीदारांची उलट तपासणीही आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली.

आज सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या न्यायालयात सुनावणीला प्रारंभ झाला. दुपारची अर्धा तासाची सुटी वगळता सायंकाळी सव्वा चार वाजेपर्यंत सलग या प्रकरणाचे कामकाज चालले. आज शवपरीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या श्रीमती देशमुख, मातोश्री कुणावार कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर आणि घटनास्थळावरील पंच सचिन बुटले या तिघांची साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीदारांची उलटतपासणी आज आरोपीचे वकील ॲड. भूपेंद्र सोने घेतली.

उद्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि आणखी काही साक्ष होण्याची शक्‍यता आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अंकिता जळीत प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील ॲड. प्रसाद सोईतकर यांनी सहकार्य केले. या जळीतकांड प्रकरणाच्या चौकशी अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव याही न्यायालयात उपस्थित होत्या.

प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे या मातोश्री कुणावर कॉलेजमध्ये जात असताना तीन फेब्रुवारीला नंदोरी चौक समोर आरोपीने पाठीमागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. यात अंकिता गंभीर जखमी होऊन नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

न्यायालय परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त

प्राचार्य डॉ. तुळसकर यांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पीडित प्राध्यापिकेला रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान तिने आरोपीचे नाव घेतले असल्याची साक्ष आज प्राचार्य डॉ. तुळसकर यांच्या वतीने नोंदविण्यात आली, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. आज न्यायालयात आरोपी विक्‍की ऊर्फ विकेश नगराळे यालाही उभे करण्यात आले. न्यायालय परिसरात सुनावणी दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

SCROLL FOR NEXT