Appeal to send proposal for Yashwantrao Chavan State Level Social, Sports Youth Award
Appeal to send proposal for Yashwantrao Chavan State Level Social, Sports Youth Award 
विदर्भ

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारासाठी  पाठवा प्रस्ताव, तरुणांना संधी 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 

‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(एक युवक व एक युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(एक युवक व एक युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्‍या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्‍या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. २१ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२० अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म  www.ycpmumbai.com  या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनिशी दिलेल्या फॉर्मवर भरून १ डिसेंबर २०२० च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर,मुंबई - २१ या  पत्त्यावर, अथवा  navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे.

पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी कार्यालयामध्ये (मनीषा खिल्लारे) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT