The arrears of various departments are over Rs.1000 crore in Yavatmal  
विदर्भ

यवतमाळचे शासकीय कार्यालय 'डिफॉल्टर' यादीत; विविध विभागांची थकीत रक्कम तब्बल १ हजार कोटींच्या वर   

चेतन देशमुख

यवतमाळ : लॉकडाउनच्या काळातील चार महिन्यांचे वीजबिले वसूल करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. यावरून वादंग सुरू आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालयाची थकबाकी १४ कोटींवर पोहोचली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडे २०१ तर पथदिव्यांची थकित रक्कम एक हजार कोटींवर गेली आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले. या काळात रिडिंग व बीलवाटप बंद होते. मार्चनंतर थेट जुलैमध्ये वीजबिले ग्राहकांना एकत्रित पाठविण्यात आलीत. बहुतांश नागरिकांनी वीजबिल माफ होईल, या आशेने अजुनही वीजबिले भरलेली नाहीत. यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी नागरिकांना दिलासा देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. 

त्यातच थकबीच्या रकमेवरुनही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. थकबाकीदारांच्या यादीत शासकीय कार्यालयांची नावे आहेत. नागपूर प्रादेशिक विभागातील शासकीय कार्यालयाकडील थकीत रक्कम १४ कोटींवर पोहोचली आहेत. त्यामुळे आता यांची वसुली आधी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

या शिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाची थकबाकी दोनशे कोटी तर पथदिव्यांची थकीत रक्कम एक हजार कोटींच्यावर आहे. काही रुपये तसेच हजारात असलेल्या रकमांसाठी नागरिकांचा वीजपुरवठा खंडीत केला जातो. लाखो रुपयांची वीजबिल असलेल्यावर कारवाई कधी, असा प्रश्‍न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

लॉकडाउनच्या काळात रोजगार बुडाल्याने अनेकांना वीजबिल भरता आले नाही. त्यातच आता वसुलीचे आदेश असून अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. एकट्या नागपूर प्रादेशिक विभागात शासकीय कार्यालयाची थकीत १४ कोटी रुपयांवर गेली आहे. महावितरणकडून सक्तीची वसुली बंद आहे. मात्र, वाढती थकबाकी पाहता ती वेळ कधीही येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

वर्गवारी-ग्राहक- थकीत रक्कम

पथदिवे- १६,२८३- १ हजार १८५ कोटी
पाणीपुरवठा- ८,६२५- २०१ कोटी
सार्वजनिक सेवा- १३,५७८- १४ कोटी

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

Latest Marathi News Updates : अपघातामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा, मुंबईला तिकिट मागायला गेलेल्या ४ भाजप पदाधिकाऱ्यांची फजिती; बारमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT