विदर्भ

अबब! खड्ड्यात एक दोन नव्हे आढळले तब्बल ९८ साप

दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : शहरातील जाजूवाडी परिसरातील घराच्या बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम (Digging pits) सुरू होते. दरम्यान, एका खड्ड्यात एक नाही दहा नाही तर तब्बल ९८ सापाची (98 snakes found) पिलावळ रविवारी दुपारी निघाल्याने खळबळ उडाली. (As many as 98 snakes were found in a pit at Wardha)

मनोज कुळमेथे, दुर्गादास कुळमेथे यांचे अगस्ती मार्ग येथे कंपाउंड वॉलच्या बांधकामासाठी खड्डे खोदणे सुरू होते. खड्ड्यात पहिले ६० नंतर ३८ असे तब्बल ९८ सापांची पिलावळ आढळून आल्याने ते घाबरले. त्यांनी लगेच सर्पमित्रांना याबाबतची माहिती दिली. यश सोयाम यांनी गरुडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्राणीमित्र गौतम पोहणे यांच्याशी संपर्क केरून अनेक साप असल्याची माहिती दिली.

त्वरित सर्प मित्र रूपेश कैलाखे यांना संपर्क करून त्यांच्यासह सोयाम यांच्या घरी पोहोचून शहानिशा केली व तिथे पाणदिवड जातींचे बिनविषारी साप आढळून आले. गरुडझेपचे प्राणीमित्र मनीष ठाकरे, तुषार साबळे, अनिल माहोरे, संतोष पडोळे, संकेत मनोरे, रोशन सूरजुसे, दुर्गेश वानखडे यांनी ९८ सापांना पकडले. वनविभाग कार्यालय आर्वी येथे ९८ सापांची नोंदणी करून लहादेवी जलाशय वनपरिक्षेत्रात सुखरूप सोडून जीवनदान देण्यात आले.

(As many as 98 snakes were found in a pit at Wardha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT