corona in akola.jpg 
विदर्भ

Lockdown : कोरोनाच्या सावटातही विकासाची गाडी सुसाट; ही कामे झाली पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 मुळे देशभर 24 मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यानंतर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोनबाहेर विकास कामे करण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे अकोला महानगरपालिका हद्दीतील प्रभाग तीनमध्ये तब्बल 32 रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. यावरून कोरोनाच्या सावटातही विकासाची गाडी शहरात सुसाट धावत असल्याचे दिसून येते.

लॉकडाउनपूर्वी अकोला महानगरपालिकेला राज्य शासनाकडून हद्दवाढ क्षेत्र विकास निधी मिळाला होता. आमदार रणधीर सावरकर यांच्या कोट्यातून 15 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 9.75 कोटी निधीतून लॉकडाउनपूर्वी रस्ते व नाल्याच्या कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले होते. खडकीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर अर्धवट अवस्थेत कामे थांबली होती. 

पावसाळा तोंडावर असताना ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासन व कंत्राटदारांपुढे होते. राज्य व केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर गत आठवड्यात रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर, नगरसेवक गितांजली शेगोकार व नगरसेवक हरीष काळे यांनी पुढाकार घेतला. 

त्यामुळे एकट्या प्रभाग तीनमध्ये तब्बल 32 रस्त्यांच्या डाबंरीकरणाची कामे रविवारपर्यंत (ता.24) पूर्ण झालीत. त्यात न्यू तापडियानगर परिसरातील 20 व दुबे वाडी परिसरातील 12 कामांचा समावेश आहे. हे दोन्ही परिसर कन्टेंमेन्ट झोनमध्ये येत नसल्याने ही कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागू शकल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुख्य रस्त्यासह नाल्याचे काम प्रस्तावित
रेल्वे लाईन ते आपातापा रोडपर्यंतच्या मुख्य रस्ता रुंदीकरणासह व मोठ्या उमरीतून वाहत येणाऱ्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यासह एकूण पाच कामे प्रस्तावित आहेत. ही कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत असले तरी नाल्याच्या कामांमध्ये अडचणी येणार आहे.

उड्डाण पुलाचे कामही व्हावे सुरू
बिर्ला रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे काम कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर थांबले आहे. हे काम कन्टेंमेन्ट झोनच्या बाहेर आहे. शिवाय मुजरांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने उड्डाण पुलाच्या उर्वरित कामालाही सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT