Attack on a dead leopard with an ax 
विदर्भ

अरेरे हे काय, मृत्यूनंतरही बिबट्यावर कुऱ्हाडीने हल्ला

संतोष ताकपिरे

अमरावती : वरुड तालुक्‍यात मध्यप्रदेश सीमेलगत महेंद्री गावातील जंगलात बिबट्याचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्यामुळे बिबट्याचे काही दातही घटनास्थळी पडून होते. 
 
मंगळवारी (ता.22) ही घटना उघडकीस आली. मृत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याची शक्‍यता वन्यजीवतज्ज्ञांनी व्यक्त केली. बिबट्याला जंगलात एका ठिकाणी विषबाधा झाली. त्यानंतर तो गतप्राण झाला की नाही, याची शहानिशा करण्यासाठी त्याचा चेहरा आणि शरीरावर कुऱ्हाडीने तीन वार केल्याचे दिसून आले. एके ठिकाणी मारले आणि दुसऱ्या ठिकाणी काही दूर अंतरावर बिबट्याचा मृतदेह आणून टाकल्याची शक्‍यता आहे. 

या घटनेनंतर वनविभागाच्या चमूने महेंद्री येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या चमूने परिसराला भेट दिली. बुधवारी (ता. 23) मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. जंगलातच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. काही वर्षांपूर्वी महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करावे, असा प्रस्ताव वनविभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता.

त्यावर प्रस्तावित अभयारण्य करावे, याबाबत चर्चाही झाली. परंतु अभयारण्य घोषित करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. शासनाने कन्झर्व्हेशन रिझर्व्ह या नावाखाली जंगल सुरक्षित असल्याचे जाहीर केले. परंतु त्यातून अभयारण्यासारखी सुरक्षितता होऊ शकत नाही. व्याघ्रप्रकल्पाचे निकष लागत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षितता पूर्णपणे करणे शक्‍य नसल्याचे मत या घटनेनंतर वन्यजीवतज्ज्ञांनी व्यक्त केले. 
 

काही अवयव तपासणीसाठी पाठविणार
मृतदेह कुजलेला असून, अळ्याही पडल्याचे दिसले. शरीराचे काही भाग गळले. ही घटना अडीच दिवसांपूर्वीची असू शकते. मृत बिबट्याच्या शरीरावर जखमा आहेत. शवविच्छेदनानंतर विबट्याचे काही अवयव तपासणीसाठी पाठविण्यात येतील. 
-लीना आडे, एसीफ, वनविभाग, अमरावती.

संपादन : अतुल मांगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : ५७ सुनावण्या, तरी निर्णय नाही! आता सरन्यायाधीशांकडूनच सुओ मोटो, आजच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष, काय आहे प्रकरण?

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर-इचलकरंजी एसटी बसला भीषण आग

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

SCROLL FOR NEXT