Attempt to blow up the office of the Superintendent of Agriculture by beating the guard 
विदर्भ

रखवालदाराला खोलीत डांबले आणि कपाट हुसकणे सुरू केले, परंतु... 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील गाडगेनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. न्यायाधीशांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांनी विसावा कॉलनीत सुद्धा कृषीअधीक्षक कार्यालयातील रखवालदारास डांबून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली. 

गाडगेनगर हद्दीतील विसावा कॉलनीमध्ये कृषी अधीक्षकांचे कार्यालय आहे. रात्रीच्या वेळी कार्यालय परिसरात चुन्नलाल चंदन नामक रखवालदार ड्यूटीवर तैनात होता. मध्यरात्रीच्या सुमारास तीन ते चार व्यक्‍तींनी आत शिरून रखवालदाराला पकडून एका खोलीत डांबून ठेवले. शिवाय येथील तीन ते चार खोलीतील काही कपाट चोरट्यांनी हुसकले. 

तोडफोडीमुळे बरेच नुकसान झाले. चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोर निघून गेल्यानंतर रखवालदाराने कृषी अधीक्षक नामदेव सदाशिवराव धनवटे यांना चोरीची माहिती दिली. धनवटे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात पसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कार्यालयातील दस्तऐवजाची पाहणी केली असता, कोणतेही महत्त्वाचे दस्तएवेज गहाळ झाले नसल्याचे कृषी अधीक्षकांनी सांगितले. 

एका अन्य घटनेत कठोरा मार्गावरील स्वयंप्रभा कॉलनीतील चेतन अशोक बाबरेकर (वय 40) हे काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले होते. रविवारी परतले असता, चोरट्याने लॉकडाऊन काळात त्यांचेही घर फोडल्याचे स्पष्ट झाले. किचनमधील टेबलची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीस गेली नाही, असे बाबरेकर यांनी गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केले. विसावा कॉलनी, स्वयंप्रभा कॉलनीसह कांतानगर येथील तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नाही, हे विशेष. 

कोरोनामुळे अर्थचक्र बदलले असून, हाताला काम नसल्याने अनेक जण बेरोजगार आहेत. पोटाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी काहींनी चोरीचा मार्ग अवलंबला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट चोरट्यांच्या टार्गेटवर आहेत. विशेष म्हणजे या भागातील बरेच नागरिक क्वारंटाईन असल्याने बहुतांश घरांना कुलूप असते. हीच संधी साधण्याचा प्रयत्न चोरटे करतात. परंतु सध्या कुणाच्याही हाताला काम नसल्याने घरफोडीतूनही त्यांना विशेष काही मिळत नसल्याचे वरील घटनांवरून उघडकीस येते. तरी पोलिसांनी चोरट्यांवर वचक बसवून नागरिकांना भयमुक्‍त करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT