Prashant Srivastav sakal
विदर्भ

Motivation News : बेवारस प्रेतांवर ऑटोचालक करतो अंतिम संस्कार

सामान्य माणुस एरवी पोलिसांपासून चारहात दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अंगावर खाकी वर्दी असली तरी पोलिसांनाही अडचणी असतात. कुणीतरी सहकार्य करावे, अशी त्यांचीही अपेक्षा असते.

सकाळ वृत्तसेवा

- अरुण कराळे

द्रुगधामना - सामान्य माणुस एरवी पोलिसांपासून चारहात दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अंगावर खाकी वर्दी असली तरी पोलिसांनाही अडचणी असतात. कुणीतरी सहकार्य करावे, अशी त्यांचीही अपेक्षा असते. या अपेक्षेवर आठवा मैल येथील ऑटोचालक खरा उतरला आहे.

सामाजिक कर्तव्य म्हणून हा ऑटोचालक पोलिसांना शासकीय कामासाठी निःशुल्क सेवा देतो. एवढेच नव्हे तर त्याने आतापर्यंत २३० बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कारही केले आहेत.

आठवा मैल येथील गणेशनगर निवासी प्रशांत श्रीवास्तव असे या ऑटोचालकाचे नाव आहे. पोलिस आणि ऑटोचालक यांचेही फारसे जमत नाही. अशा अशा नकारात्मक परिस्थितीत प्रशांत श्रीवास्तव मात्र उन्हातान्हात सेवा देणाऱ्या पोलिसांच्या मदतीला धावतो. दिवसरात्र ड्यूटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते पाच पर्यंत निःशुल्क सेवा देण्याचा वसा या ऑटोचालकाने घेतला आहे.

प्रशांतची पोलिसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे. स्वार्थी युगात पैशासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. कुणी माणुसकी वेशीवर टाकून पैसा कमावतात तर कोणी इमानेइतबारे पैशाला फक्त साध्य नव्हे तर साधन म्हणून अर्थार्जन करतात.

प्रशांत श्रीवास्तव यांनी २०१७ मध्ये ‘फ्री ऑटो सेवा बहुउद्देशीय संस्था नागपूर’ या संस्थेची स्थापना करून पोलीस व बेवारस प्रेतासाठी निःशुल्क ऑटो सुरु केली. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून किमान २३० बेवारस प्रेतांवर अंतिम संस्कार करण्यात आले.

या संस्थेला सहा वर्ष पूर्ण झाले असून तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या प्रेरणेने पोलीस उपनिरीक्षक मंगेश घोळे व बालू राठौड यांच्या मार्गदर्शनात प्रशांत श्रीवास्तव यांनी संस्थेची स्थापना केली. सामाजिक कार्याचे कौतुक करीत पोलीस उपमहानिरीक्षक सतीश माथुर, सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी प्रशांत श्रीवास्तव यांचा सत्कार केला होता.

या संस्थेला स्व. उत्तम काळबांडे, पूनमचंद खोब्राराकडे, राजू धाकडे, मिथुन प्रधान, विजय बहुरिया, नरेंद्र कैतवास, परमेश्वर काळबांडे, गोलू काळबांडे, स्व. रवी तंतरपाडे यांनी मदत केली. आजपर्यंत या संस्थेला दोन हजार ऑटोचालकांनी मदत केली आहे. संस्थेचे उपाध्यक्ष दीपक श्रीवास्तव, दवलामेटीचे माजी सरपंच भीमराव मोटघरे, मनोज श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात ही संस्था आजही काम करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

५०० हून जास्त विकेट्स, पण मानसिक आरोग्याशी संघर्ष! इंग्लंडच्या ३२ वर्षीय खेळाडूने घेतली धक्कादायक निवृत्ती

Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Numerology: पैसा-अडका असला तरी दिखावा नाही! साधं जगणं पसंत करतात ‘या’ ३ मूलांकाचे लोक; स्वभाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT